‘आत्मनिर्भर’साठी तांत्रिक व्यवसाय शिक्षणाची संधी; प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:40 PM2020-08-03T12:40:20+5:302020-08-03T12:46:23+5:30
विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावरील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, आॅटोमोबाईल टेक्नॉलॉजी या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल.
पुणे : इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना तांत्रिक व्यवसाय शिक्षण घेऊन ‘आत्मनिर्भर’ होण्याची संधी आहे. शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील व्होकेशनल अभ्यासक्रमांची (एमसीव्हीसी) प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरावरील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, आॅटोमोबाईल टेक्नॉलॉजी या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल.
‘आत्मनिर्भर भारत’ अशी घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध तांत्रिक कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर होण्याची संधी तरूणांना आहे. आगामी काळात कुशल मनुष्यबळाची जगात मोठी गरज भासणार आहे. हे कौशल्य देणारे अभ्यासक्रम म्हणजे दहावीनंतरचे ‘व्होकेशनल’ अभ्यासक्रम. याअंतर्गत टेक्निकल, कॉमर्स अँड ट्रेड, हॉस्पिटॅलिटी, फिशरी पॅरामेडिकल व कृषी यांसारख्या विविध गटातील अभ्यासक्रम शिकता येतात. विद्यार्थिनींसाठीही सर्व अभ्यासक्रम उपयुक्त आहेत. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. मुख्य म्हणजे हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर आधारित असल्याने विद्यार्थी दोन वर्षात आधुनिक ज्ञान घेऊन कौशल्य आत्मसात करतात. प्रवेश घेताना ठराविक टक्क्यांची गरज नाही. अगदी पस्तीस टक्के गुण असणारा विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतो. तसेच १ किंवा २ विषयात नापास झालेले एटीकेटी असणारे विद्यार्थी काही अटींवर प्रवेश घेऊ शकतात.
परीक्षा उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत घेतली जाते म्हणजेच विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बारावी व्होकेशनल उत्तीर्ण होतो. पुढे त्याच विषयात अभियांत्रिकी पदविका च्या दुसºया वर्षाला थेट प्रवेश मिळू शकतो. बी.व्होक. ,बी.एस्सी, बी.कॉम ,बी.ए व बी.सी.ए या पदवी अभ्यासक्रमांना ही प्रवेश घेता येतो. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीचा व सवलतींचा लाभ घेता येतो.
-------------
अनुदानित व विनाअनुदानित अशा अनेक संस्थांमधून हे अभ्यासक्रम सुरू आहेत.
या अभ्यासक्रमांना पुणे, मुंबई शहरांकरिता केंद्रीय पद्धतीने प्रवेश घ्यावा लागतो. याबाबत अधिक माहिती या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. तसेच एसएससी मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे . जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात तसेच संस्थांमध्ये माहिती मिळू शकेल.
- मंजुषा पागे
शासकीय तांत्रिक विद्यालय,घोले रोड,पुणे
-----------------
याअंतर्गत असणारे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे -
१. टेक्निकल ग्रुप- इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, आॅटोमोबाईल टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी
२. कॉमर्स अँड ट्रेड - अकाउंटिंग अँड फायनान्स फायनान्शियल, आॅफिस असिस्टंट, लॉजिस्टिक अँड सप्लाय मॅनेजमेंट
३. हॉस्पिटॅलिटी- फुड प्रोडक्शन, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट
४. अँग्रीकल्चर -हॉर्टिकल्चर, क्रॉप सायन्स अँड अँनिमल हसबंडरी, डेअरी टेक्नॉलॉजी
५. पॅरामेडिकल- रेडिओलॉजी टेक्निशियन, मेडिकल लॅब टेक्निशियन, चाईल्ड अँड ओल्ड एज हेल्थकेअर
६. फिशरी - फिशरी टेक्नॉलॉजी
--------------