इंदापूरच्या तहसीलदारांची मॅटकडे धाव

By admin | Published: March 28, 2016 03:14 AM2016-03-28T03:14:10+5:302016-03-28T03:14:10+5:30

प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्यांना नियमित तहसीलदार पदावर नियुक्ती करण्याकरिता इंदापूरच्या तहसीलदारांची अवघ्या दहा महिन्यांत बदली करण्यात आली. जिल्हाधिकारी

The tehsiladars of Indapur tipped the mat | इंदापूरच्या तहसीलदारांची मॅटकडे धाव

इंदापूरच्या तहसीलदारांची मॅटकडे धाव

Next

इंदापूर : प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्यांना नियमित तहसीलदार पदावर नियुक्ती करण्याकरिता इंदापूरच्या तहसीलदारांची अवघ्या दहा महिन्यांत बदली करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या निणर्याच्या विरोधात इंदापूरच्या तहसीलदारांनी मॅटकडे धाव घेतली आहे. सोमवारी त्याबाबत हालचाल होण्याची शक्यता आहे.
दहा महिन्यांपूर्वी सूर्यकांत येवले यांची इंदापूरचे तहसीलदार म्हणून नेमणूक झाली. आल्यापासून अवैध वाळू वाहतूक,बेकायदेशीर खडी क्रशर आदी व्यवसायांवर त्यांनी कारवाई करण्याचा धडाका लावला. लुमेवाडी येथील अवैध प्रवासी वाळूसाठ्यावर कधी ही कारवाई झाली नव्हती. ती त्यांनी करून दाखवली होती. शासनाच्या महसुली उत्पन्नात भरीव भर टाकणाऱ्या येवले यांच्या वाहनाला वाळू वाहतूकदारांनी धडक देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंदळकर यांच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांच्या संघटनेने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करताना, येवले यांना लक्ष्य केले. तहसील कार्यालयात हंगामा केला. त्या वेळी येवले प्रकाशात आले. त्यानंतर त्यांच्या शासकीय वाहनचालकाचा संशयास्पद अपघात झाला. या घटनेनंतर काही दिवस उलटून गेल्यानंतर, दि.१९ मार्च रोजी त्यांची तडकाफडकी बदली झाली.
एकत्रित परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी वर्षा लांडगे यांना दि.२१मार्च ते २१ आॅगस्ट या २२ आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत नियमित तहसीलदार या पदावर नियुक्ती करण्यासाठी, येवले यांची रीतसर उचलबांगडी करण्यात आली.
आपले कामकाज चांगले असताना, महसुली उत्पन्नात वाजवी भर टाकण्यातदेखील कसलीही कुचराई झाली नसताना का बदली करण्यात आली, असा सवाल उपस्थित करून बदलीस स्थगिती मिळावी, यासाठी येवले यांनी मॅटकडे धाव घेतली आहे. सोमवारी त्याबाबत हालचाल होण्याची शक्यता आहे.

Web Title: The tehsiladars of Indapur tipped the mat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.