अवैध माती वाहतुकीवर तहसीलदारांची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:10 AM2021-01-22T04:10:25+5:302021-01-22T04:10:25+5:30
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध माती वाहतूक होत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करून कारवाई होत ...
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध माती वाहतूक होत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करून कारवाई होत नव्हती. मात्र, या अचानक झालेल्या कारवाईने अवैध माती वाहतूक करणारांचे धाबे दणालेले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये रात्री १०.३० वाजणेच्या सुमारास तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी पाईट, पाळू , परिसरात अचानक भेट दिली. यावेळी त्यांना चार ट्रकमधून मातीची चोरी होत असल्याचे दिसले. त्यांनी ही सर्व वाहने ताब्यात घेतली. याबाबत पाईट मंडल अधिकारी एच. सोनवणे यांनी पंचनामे करून ३ वाहने पाईट पोलीस चौकीत जमा केली. यासाठी मंडल अधिकारी यांना पोलीस हवालदार सावंत यांनी सहाय्य केले.
फोटो पाईट, ता. खेड येथे रात्रीच्या सुमारास माती वाहतूक करणारी वाहने हस्तगत केली.