मंचर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसलीदारांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:40+5:302021-04-06T04:10:40+5:30

मंचर येथील ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या बैठकीत तहसीलदार जोशी बोलत होत्या. मंचर शहरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार ...

Tehsildar's appeal to prevent Manchar Corona outbreak | मंचर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसलीदारांचे आवाहन

मंचर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसलीदारांचे आवाहन

Next

मंचर येथील ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या बैठकीत तहसीलदार जोशी बोलत होत्या.

मंचर शहरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे,जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात ,पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, सरपंच किरणताई राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेले,सदस्य अरूणनाना बाणखेले,सतीश बाणखेले,कैलास गांजाळे ,विशाल मोरडे ,माणिकताई गावडे, वंदना बाणखेले, सविता शिरसागर, ज्योती निघोट, ज्योती बाणखेले, ज्योती थोरात, दीपाली थोरात , ग्रामविकास अधिकारी के.डी. भोजने उपस्थित होते.

तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश ढेकळे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज शंभर कुटुंबांची तपासणी केली पाहिजे. प्रत्येक आठवड्याला प्रत्येक कुटुंबाचा दोन वेळा सर्वे झाला पाहिजे. नागरिकांनी घरातील लहान मुले पॉजिटीव्ह येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. उलट्या व जुलाब हे कोरोनाचे नवे लक्षण काही नागरिकांमध्ये आढळत आहे.अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तपासणी करणे आवश्यक आहे. यावेळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,प्रा. राजाराम बाणखेले व उपस्थितांनी सूचना मांडल्या .

Web Title: Tehsildar's appeal to prevent Manchar Corona outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.