पूर्व हवेलीचे तहसीलदार कार्यालय वाघोलीला नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:59+5:302021-03-21T04:11:59+5:30
उरुळीकांचन: नव्याने अस्तित्वात आलेल्या पूर्व हवेलीचे तहसील कायार्लय वाघोली करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, येथील नागरिकांना वाघोली ...
उरुळीकांचन: नव्याने अस्तित्वात आलेल्या पूर्व हवेलीचे तहसील कायार्लय वाघोली करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, येथील नागरिकांना वाघोली येथे जाणे जिकरीचे होणार आहे. जर त्या ठिकाणी तहसील कार्यालय झालेच जर वाहतूकीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे वाघोलीला तहसील कार्यालय नकोच त्या ऐवजी कदमवाकवस्ती ते उरुळीकांचन दरम्यान जागा मिळेल त्या ठिकाणी कार्यालय उभारावे अशी मागणी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन व उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सदस्य भाऊसाहेब लक्ष्मण कांचन यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार अशोक पवार यांनी हवेली तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यावर असणारा कामाचा बोजा व ताण कमी करण्याच्या उद्देशाने हवेली तहसीलदार कार्यालयाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता व तो मंजूर करून घेऊन प्रत्यक्षात अंमलात आणला आहे, मात्र या कार्यालयाला नेमके कोठे स्थापन करायचे याबाबत सध्या वेगवेगळी चर्चा चालू असून काहींच्या म्हणण्यानुसार ते कार्यालय वाघोलीला करण्याचा आग्रह आमदारांकडे धरला आहे, मात्र वाघोलीचा विचार करता वाघोली हे पुणे महानगर पालिकेत समाविष्ट झाले असून पुणे नगर रोडवर असलेली वाहतुकीची गंभीर समस्या विचारात घेऊन पूर्व हवेलीतील नागरिकांना वाघोली या ठिकाणी जाऊन आपले कामकाज करणे गैरसोयीचे होणार असल्याने वाघोली ऐवजी हे कार्यालय कदमवाक वस्ती ते उरुळी कांचन या दरम्यान ज्या ठिकाणी या कार्यालयासाठी योग्य अशी जागा उपलब्ध होईल, त्या ठिकाणी ते निर्माण करावे अशा प्रकारची मागणी लेखी निवेदनाद्वारे आमदार अशोक पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच उरुळी कांचन येथे या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची हमी यावेळी आमदार अशोक पवार यांना देण्यात आली आहे.
याबाबत आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की माझ्याकडे ज्या ज्या गावांनी आमच्या कडे तहसीलदार कार्यालय व्हावे अशी मागणी केली आहे त्या मागणी पत्राच्या आधाराने पुणे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्षात जागेची पाहणी करून घेऊन तसा अहवाल शासनाला पाठवण्याची जबाबदारी देणार आहोत व त्यानंतर सर्व समावेशक असा निर्णय घेऊन सर्वांची सोय कशी होईल या बाबीकडे लक्ष दिले जाणार आहे.
फोटो
आमदार अशोक पवार यांना निवेदन देताना संतोष आबासाहेब कांचन व भाऊसाहेब लक्ष्मण कांचन.