तेजस मोरे म्हणतोय, माझ्यावर खोटे आरोप..., प्रवीण चव्हाणांच्या अडचणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 08:15 PM2022-03-13T20:15:44+5:302022-03-13T20:33:20+5:30

विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांना आपण कोणतेही घड्याळ भेट दिले नसून त्यांनी अकारण आपल्यावर हा आरोप केला आहे

Tejas More says false allegations against me increase in difficulty of Praveen Chavan | तेजस मोरे म्हणतोय, माझ्यावर खोटे आरोप..., प्रवीण चव्हाणांच्या अडचणीत वाढ

तेजस मोरे म्हणतोय, माझ्यावर खोटे आरोप..., प्रवीण चव्हाणांच्या अडचणीत वाढ

googlenewsNext

पुणे : विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांना आपण कोणतेही घड्याळ भेट दिले नसून त्यांनी अकारण आपल्यावर हा आरोप केला आहे. या स्टिंग ऑपरेशनमुळे प्रविण चव्हाण यांचा काळा चेहरा समोर आल्याचे तेजस मोरे यांनी सांगितले.

आपल्या कार्यालयात तेजस मोरे याने भेट दिलेल्या घड्याळात स्पाय कॅमेरा बसविला होता, त्यातून हे स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. यावर तेजस मोरे यांनी आपली बाजू मांडली. तेजस मोरे यांनी सांगितले की, ॲड. चव्हाण खोटे बोलत आहेत. त्यांच्या कार्यालयात घड्याळ अथवा छुपा कॅमेरा बसविला नाही. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी पुरावे द्यावेत.

ॲड. चव्हाण यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत तेजस मोरे यांनी सांगितले की, मी सुरुवातीला त्यांना देव मानत होतो. मी ५ महिने तुरुंगात होतो. त्यांनी जामीनावर माझी सुटका केली. त्यांच्या कार्यालयात असताना एकदा त्यांच्या इंग्रजी ग्रामरमधील काही चुका मी दुरुस्त केल्या होत्या. माझे इंग्रजी चांगले असल्यामुळे विविध खटल्यातील जबाब ते सांगतील त्या पद्धतीने मी इंग्रजीत टाईप करून देत होतो. अनेकांचे जबाब मी नोंद केले आहेत. मला कायद्याचे ज्ञान नसल्याने असे जबाब तयार करुन देण्याचे सरकारी वकीलाचे कामच आहे, असा माझा समज होता.

भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रकरणाशी संबंधित जबाब देखील मी तयार केले. ९ जानेवारी रोजी पुणेपोलिसांनी भोईटे व इतरांच्या जळगावमधील घरी छापे घातले. पुणे पोलिसांनी भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट केले होते. तेव्हापासून मी ॲड. चव्हाण यांच्यापासून दूर गेलो असल्याचा गौप्यस्फोट मोरे यांनी केला.

पुणे पोलिसांच्या जेवणाचे बिल दिले

जळगाव येथे पुणे पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी ते औरंगाबाद येथे जेवणासाठी थांबले होते. चव्हाण यांच्या सांगण्यावरुन त्यांची जेवणाची सोय मी केली होती. त्याचे बिलही गुगल पे द्वारे आपण दिल्याचा दावा तेजस मोरे यांनी केला आहे. गिरीश महाजन यांना अडकविण्यासाठी आधी अनिल देशमुख आणि नंतर एकनाथ खडसे यांनी सांगितल्याचे चव्हाण सांगत होते. मी लवकरच माध्यमांसमोर प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती तेजस मोरे यांनी दिली आहे.

Web Title: Tejas More says false allegations against me increase in difficulty of Praveen Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.