पुणे विभागातर्फे रेल्वे गाड्यांमधील महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी पथकाचा पुढाकार

By नितीश गोवंडे | Published: August 23, 2023 02:56 PM2023-08-23T14:56:02+5:302023-08-23T14:56:26+5:30

रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ आणि विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष क्रमांक ७२१९६१३७७७ बद्दल जागरुकता निर्माण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे...

Tejaswini team initiative for safety of women and children in railway trains by Pune division | पुणे विभागातर्फे रेल्वे गाड्यांमधील महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी पथकाचा पुढाकार

पुणे विभागातर्फे रेल्वे गाड्यांमधील महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी पथकाचा पुढाकार

googlenewsNext

पुणे : मध्य रेल्वेच्यापुणे विभागात रेल्वेमधील महिला आणि मुलांची सुरक्षितता तसेच जनजागृती करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून १५ ऑगस्ट पासून तेजस्विनी पथक सुरू करण्यात आले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सुरक्षा बल उदयसिंह पवार यांच्या नेतृत्वात हा जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे. रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ आणि विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष क्रमांक ७२१९६१३७७७ बद्दल जागरुकता निर्माण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

या तेजस्विनी पथकामध्ये सहायक उपनिरीक्षक पूनम शर्मा आणि २ महिला आरपीएफ कर्मचारी असून हडपसर येथील निरीक्षक प्रिती कुलकर्णी या पथकाचे पर्यवेक्षण करत आहेत. हे पथक पुणे ते लोणावळा पर्यंतच्या रेल्वे एस्कॉर्ट करत आहे. तसेच डेक्कन, इंटरसिटी, सिंहगड एक्स्प्रेस आणि दैनंदिन लोकल सेवांमध्ये दररोज महिला प्रवाशांशी संवाद साधला जात आहे. यासाठी सोशल मीडियावर एक ग्रुप तयार करण्यात आला असून यामध्ये पुणे, शिवाजीनगर, हडपसर येथील आरपीएफ ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, विभागीय सुरक्षा नियंत्रण क्रमांक, यात्री सुरक्षा निरीक्षक आणि चिंचवड यांच्या सोबत दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना जोडण्यात आले आहे. आरपीएफला व्हॉट्सअप ग्रुपच्या मदतीने महिला प्रवाशांशी संपर्कात राहण्याची सुविधा असुन, गुन्ह्यांचे निराकरण करण्यासाठी आणि रेल्वेतील सुरक्षेबाबत वेळेवर सूचना देण्यासाठी, घटनांचे वेळेवर अहवाल देण्यास यामुळे मोठी मदत मिळणार आहे.

महिलांवरील हिंसाचार हा कधीच खाजगी विषय नसतो. महिलांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकाबाबत जनजागृती करण्यासाठी आरपीएफ विभागातर्फे मोहीम राबवली जात आहे. महिला प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करून हे तेजस्वीनी स्क्वॉड महिला प्रवाशाच्या मदतीसाठी नेहमीच उपलब्ध राहणार आहे.

Web Title: Tejaswini team initiative for safety of women and children in railway trains by Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.