बीएसएनएलच्या मनमानी कारभारामुळे दूरध्वनी सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:53 PM2019-02-18T23:53:52+5:302019-02-18T23:54:03+5:30

आदिवासी भागातील जनता त्रस्त : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, व्यवहार ठप्प

Telephone service closed due to BSNL's arbitrary operation | बीएसएनएलच्या मनमानी कारभारामुळे दूरध्वनी सेवा बंद

बीएसएनएलच्या मनमानी कारभारामुळे दूरध्वनी सेवा बंद

Next

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये दहा दिवसांपासून बीएसएनएल कंपनीच्या अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे दूरध्वनी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे आदिवासी भागातील जनता त्रस्त झाली आहे. या बीएसएनएल कंपनीच्या अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून या भागात नेटवर्कचा लपंडाव चालू आहे. कुठे केबल तुटणे, लाइट नसणे, मनोºयामध्ये नादुरुस्त होणे, तर कधी किरकोळ बिघाडांमुळे दूरध्वनी सेवा विस्कळीत होणे अशा समस्या निर्माण होतात. परंतु बीएसएनएल कंपनीचे अधिकारी याकडे ढुंकूणही पाहत नाहीत.

आज काय केबल नाही, उद्या काय डिझेल नाही त्यामुळे इंजिन बंद आहे, तर परवा काय लाईटची समस्या अशी उत्तरे देत हे अधिकारी आदिवासी जनतेला फसविण्याचे काम करीत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या भागातील बीएसएनएल सेवा बंद झाली आहे, याबाबत बीएसएनएल वरिष्ठ अधिकारी नारायणकर यांना विचारले असता तळेघर येथील मनोºयाला करण्यात येणारा विद्युत पुरवठा वीजबिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. विद्युत पुरवठा नसल्यामुळे बीएसएनएल सेवा बंद झाली आहे. ही जबाबदारी बीएसएनएल कंपनीच्या वरिष्ठांची आहे, असे सांगण्यात आले सध्या या भागामध्ये खासगी दूरध्वनी मनोºयांची उभारणी चालू आहे, या खासगी कंपन्यांची तर पाठराखण करण्यासाठी हे अधिकारी असे डाव तर करत नाही ना, अशी चर्चा आदिवासी भागात चालू आहे.
बीएसएनएल कंपनीच्या या गलथान कारभारात लवकरात लवकर सुधारणा व्हावी; अन्यथा घोडेगाव येथील तहसील कार्यालय व मंचर येथील बीएसएनएल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.

आर्थिक व्यवहार ठप्प

तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणारे तळेघर हे गाव शैक्षणिक, राजकीय, व्यापार, उद्योग,बँक या दृष्टीने केंद्रबिंदूचे ठिकाण असल्याने हे गाव आदिवासी भागाची राजधानी म्हणून ओळखले जाते. या गावाचा आदिवासी भागातील ४० गावांशी संपर्क जोडला आहे. बँकांचे व्यवहार आॅनलाइन झाल्यामुळे बँकांचे अधिकारी नेटवर्क असल्याशिवाय बँकांचे व्यवहार ग्राहकांशी करेणात, रेंज नसल्यामुळे साठ ते सत्तर कि.मी. अंतरावरून पायी चालत आलेल्या आदिवासी बांधवांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे, याचे सोयरसूतकही या अधिकाºयांना नाही.
 

Web Title: Telephone service closed due to BSNL's arbitrary operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.