संपूर्ण राज्यात तापमानात घटगोंदिया ८ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:58+5:302020-12-24T04:11:58+5:30
पुणे : विदर्भाच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील ...
पुणे : विदर्भाच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील जवळपास सर्व ठिकाणचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घटले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. देशात हरियानातील हिस्सार येथे सर्वात कमी किमान तापमान २.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
काेकण, गोव्याच्या बहुतांश भागात व मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमानात पुढील काही दिवसात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ८.३, लोहगाव ९.७, जळगाव ९.७, कोल्हापूर१४.५, महाबळेश्वर १२.१, मालेगाव ११.२, नाशिक ८.२, सांगली १२.४, सातारा १०.१, सोलापूर ११.६, मुंबई १९.६, सांताक्रुझ १५.८, रत्नागिरी १७.७, पणजी १९.७, डहाणु १६.३, उस्मानाबाद ११, औरंगाबाद ९.६, परभणी ९.६, नांदेड १०.५, अकोला १०.६, अमरावती १३, बुलढाणा ११.३, ब्रम्हपूरी ९.२. चंद्रपूर ९.४, गोंदिया ८, नागपूर ९.२. वाशिम १०, वर्धा ९.२.