मंदिर कोशकार मोरेश्वर कुंटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:14+5:302021-03-26T04:11:14+5:30

पुणे : मंदिर कोशाचे गेली २० वर्षे अथकपणे काम करणारे मोरेश्वर कुंटे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे ...

Temple lexicographer Moreshwar Kunte passed away | मंदिर कोशकार मोरेश्वर कुंटे यांचे निधन

मंदिर कोशकार मोरेश्वर कुंटे यांचे निधन

Next

पुणे : मंदिर कोशाचे गेली २० वर्षे अथकपणे काम करणारे मोरेश्वर कुंटे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

मंदिरांच्या माहितीसाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने देखील त्यांची दखल घेतली आहे. कुंटे यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९३९ रोजी कऱ्हाड येथे झाला. मोरेश्वर आणि विजया कुंटे या दाम्पत्याने १८ नोव्हेंबर १९९१ रोजी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. तेव्हापासून त्यांनी देवदर्शनासाठी विविध मंदिरांना भेटी देण्यास सुरुवात केली; पण देवदर्शन इतकेच निमित्त न ठेवता ही माहिती संकलित करण्यास सुरुवात केली.

एक-एक जिल्हा ठरवून प्रत्येक शहरात, खेडेगावात जाऊन तेथील ऐतिहासिक माहिती, मंदिर आणि मूर्तीची माहिती, पूजेची पद्धत, सध्याची परिस्थिती तसेच जुनी व नवी छायाचित्रे अशी विविधांनी माहिती जमवून

त्यांनी मंदिर कोश प्रसिद्ध केला.

१९९१ पासून आत्तापर्यंत ३३ जिल्ह्यांतील १८ हजारांहून अधिक मंदिरे त्यांचे २५ हजारांहून अधिक फोटो, अशी माहिती त्यांनी एम ८० या दुचाकीवरून सुमारे सव्वा लाख किलोमीटरचा प्रवास करून संकलित केली. या विषयावर त्यांनी ४० पुस्तके लिहिली.

-----------

Web Title: Temple lexicographer Moreshwar Kunte passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.