मंदिरे उघडणार! पुण्यात लसींचे दोन डोस बंधनकारक आहेत का? नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 16:39 IST2021-10-05T16:38:56+5:302021-10-05T16:39:57+5:30

१० वर्षाखालील लहान मुले व ६५ वर्षे वरील ज्येष्ठांना मंदिर दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे

Temples to open Are two doses of vaccine mandatory in Pune? Rules announced | मंदिरे उघडणार! पुण्यात लसींचे दोन डोस बंधनकारक आहेत का? नियमावली जाहीर

मंदिरे उघडणार! पुण्यात लसींचे दोन डोस बंधनकारक आहेत का? नियमावली जाहीर

ठळक मुद्दे कोरोना प्रादूर्भावामुळे नियम पाळणे बंधनकारक

पुणे : राज्यातील मंदिरे घटस्थापनेपासून उघडली जाणार आहेत. पुणे जिल्हा प्रशासनाने याबाबत नियमावली जाहीर केेली आहे. यामध्ये लसींच्या दोन डोसची सक्ती केलेली नाही. मात्र, १० वर्षाखालील लहान मुले व ६५ वर्षे वरील ज्येष्ठांना मंदिर दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. तर मास्क बंधनकारक, सहा फुटाचे अंतर ठेवावे, साबण किंवा हॅंडवॉशने हात स्वच्छ धुवावेत, कुठल्याही प्रकारचे पूजेचे साहित्य व प्रसाद मंदिरात आणू नये, कोरोना रुग्ण आढळल्यास मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, या नियमांचे पालन करुनच मंदिरामध्ये प्रवेश करावा, असे या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे उघडण्याबाबत ‘ब्रेक द चेन’चे सुधारित मार्गसूचना प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. यामध्ये स्थानिक प्रशासनाने याबाबत काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहेत. याबाबतचे आठ सूचना, तर त्या-त्या ठिकाणच्या मंदिर व्यवस्थापन-प्रशासनाने काय खबरदारी घ्यायची याबाबतच्या २७ प्रकारच्या विविध सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. 

मंदिरात जाण्यापूर्वी या गोष्टी बंधनकारक 

मास्कचा वापर बंधनकारक, गर्दी न करता सहा फुटाचे अंतर पाळणे, हॅंडवॉशचा वापर करून हात स्वच्छ धुवावेत, विनाकारण कुठल्याही वस्तूला हात लावण्यास टाळावे, कुठल्याही प्रकारचे पूजेचे साहित्य व प्रसाद मंदिरात आणू नये, कोरोना रुग्ण आढळल्यास मंदिर बंद केले जाईल व पुन्हा मंदिर स्वच्छ करून उघडले जाईल, असे या वेळी देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

 कोणत्या मंदिराचे काय नियम?

- भीमाशंकर’ला रोज ३ हजार भक्तांनाच दर्शन

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे एसटी बस स्थानक ते कोंढवळ फाटा या दरम्यान नवीन रस्त्याचे काम चालू आहे. वाहने पुढे आणल्यास वाहतूककोंडी अथवा अपघात होऊ नये यासाठी येणार्‍या भाविक भक्तांनी भीमाशंकर पासून अलीकडे दोन-तीन किलोमीटर वाहने उभी करुन दर्शनासाठी येवून आपली होणारी गैरसोय टाळावे. तसेच श्री क्षेञ भीमाशंकर देवस्थान व प्रशासनाला सहकार्य करावे.
- ॲड. सुरेश कौदरे, अध्यक्ष, श्री क्षेञ भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट

- ‘मोरगाव’च्या मंदिरात मास्क शिवाय प्रवेश नाही

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्टने दर्शन रांगेमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी मार्किंग केले आहे. सर्व भाविकांना हातावर सॅनिटायझर देऊनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. संपूर्ण मंदिरामध्ये दिवसातून दोन वेळा प्रसंगी अधिक वेळा सॅनिटायझेशन केले जाणार आहे. मास्क शिवाय कुठल्याही भाविकाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे शासकीय नियमाचे अधिकाधिक अंमलबजावणी करण्यासाठी जागोजागी सुरक्षा रक्षक व सफाई कामगाराचे आयोजन केले जाणार आहे.

- ‘चतुश्रृंगी’च्या दर्शनासाठी नियम पाळणे बंधनकारक!

गुरूवापासून नवरात्री उत्सवाला सुरूवात होत आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व विश्वस्त व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. येणाऱ्या भाविकांनी लस घेतलेली असावी. मंदिर सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी यंदा कोणत्याही प्रकारची स्वतंत्र रांगेची व्यवस्था नसेल. तर मंदिराची मोठी जागा असल्याने एका वेळी १ हजार लोकांना सामावून घेऊ शकतो. मात्र, त्याबाबत पोलीस प्रशासनाशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे चुतुश्रंगी मंदिराचे व्यवस्थापक दिलीप अनगळ यांनी सांगितले. तसेच कोरोनाचे प्रादूर्भाव लक्षात घेऊन शासनाने सांगितलेले नियम पाळणे भाविकांना बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: Temples to open Are two doses of vaccine mandatory in Pune? Rules announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.