मंदिरे होणार खुली, जेजुरीत आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:12 AM2021-09-26T04:12:34+5:302021-09-26T04:12:34+5:30
गतवर्षी मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीचा सामना करताना कोरोना विषाणूचा फैलाव टाळण्यासाठी शासन निर्णयानुसार महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले ...
गतवर्षी मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीचा सामना करताना कोरोना विषाणूचा फैलाव टाळण्यासाठी शासन निर्णयानुसार महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरीचे खंडोबा मंदिर भाविकांना देवदर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२० रोजी निर्बंध घालत पुन्हा मंदिर खुले करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट मार्च २०२१ मध्ये सुरू झाली आणि २ एप्रिल पासून भाविकांना देवदर्शन बंद करण्यात आले. शहराचे अर्थकारण येणाऱ्या भाविकांच्या धार्मिक विधी व धर्मकारणावर अवलंबून असल्याने गेल्या दीड वर्षाच्या बंद काळात सर्व शहराची आर्थिक घडी विस्कटली.
गेल्या महिन्यात देव संस्थानच्या विश्वस्त मंडळाने पूरग्रस्तासाठी ११ लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे सुपूर्द केला होता.यावेळी झालेल्या बैठकीत देवदर्शनासाठी काही निर्बंध घालून मंदिरे सुरू करावीत अशी राज्यातील भाविकांची मागणी असून जेजुरी नगरीची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे निदर्शनास आणून देत देवदर्शनासाठी मंदिरे खुली करावीत अशी विनंती विश्वस्त मंडळाने केली होती. तसेच राज्यातूनही अनेक धार्मिक न्यास व संस्थानी अशीच मागणी केली होती.
त्यानुसार मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने ७ ऑक्टोबर घटस्थापना पासून भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण जेजुरी शहरात आनंदाचे वातावरण आहे. मंदिरे सुरू करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करून आभार मानतो असे विश्वस्त शिवराज झगडे व संदीप जगताप यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, पर्यवेक्षक गणेश डीखळे, संतोष खोमणे, लेखापाल महेश नाणेकर, पुजारी रवींद्र बारभाई, महेश आगलावे, राहुल कटफळकर, सतीश कदम आदी उपस्थित होते.
चौक
शासनाच्या नियमावलींचे पालन करा : विश्वस्त जगताप
येत्या ७ ऑक्टोबरपासून भाविकांना देवदर्शनासाठी मंदिरे खुली होणार असले तरी कोरोनाचा राक्षस अजून संपलेला नाही. प्रशासनाकडून ज्या सूचना, अटी व नियमावली येईल तिची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.
- संदीप जगताप, विश्वस्त
फोटो :
भाविकांना देवदर्शनासाठी मंदिर खुले करण्याच्या निर्णयाचे देवस्थान विश्वस्त मंडळ कर्मचारी वर्गाकडून भांडाऱ्याची उधळण
250921\192-img-20210925-wa0170.jpg
भंडाऱ्याची उधळण