टेम्पो उचलतो दिवसात फक्त २१ दुचाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 05:28 AM2018-05-25T05:28:25+5:302018-05-25T05:28:25+5:30

वाहतूक विभागाची माहिती : वाहनसंख्या नोंदीमध्ये घोळाचा संशय

Tempo lift only 21 bikes a day! | टेम्पो उचलतो दिवसात फक्त २१ दुचाकी!

टेम्पो उचलतो दिवसात फक्त २१ दुचाकी!

googlenewsNext

पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यांवर नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी आलेला टेम्पो खचाखच भरलेला दिसतो. त्यामुळे दररोज शेकडो
वाहनचालकांवर नो पार्किंगची कारवाई होत असल्याचा
समज पुणेकरांचा होईल. नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी हे टेम्पो दिवसभर खपत असले, तरी पोलिसांच्या वाहतूक विभागाला त्यांच्या कामाचे वावडे असल्याचे नोंदींवरून दिसते. वाहतूक विभागाच्या नोंदीनुसार एक टेम्पो दररोज सरासरी फक्त २१ वाहने उचलत आहे. वाहनसंख्या, वाहतूककोंडी आणि पार्किंगची दुरवस्था शहरातील एक प्रमुख समस्या झाली आहे. लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज
रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, शहर मध्यवस्तीतील पेठा आणि विविध ठिकाणी बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यासाठी ५ टेम्पो कार्यरत आहेत. फरासखाना, विश्रामबाग, डेक्कन, कोथरूड, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, सांगवी आणि हडपसर या विभागांत जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत प्रत्येक महिन्यात कारवाई झाल्याचे दिसून येत आहे.
बेशिस्तपणे वाहने लावून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी निळे टेम्पो फारच तत्पर असल्याचे पाहायला मिळते. या कारवाईबाबत माहिती अधिकार अन्वये वाहतूक विभागाकडे विचारणा केली असता, वाहने उचलणाºयांची कामगिरी अगदीच खराब असल्याचे दिसून आले आहे. नोकरदारांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, त्यांचा की रिझल्ट एरिया (केआरए) अगदी खराब असल्याचे वाहतूक विभागाचे म्हणणे आहे.

पावत्यांच्या प्रती नाहीत उपलब्ध : टोइंग डायरीत नोंद नाही
1 गेल्या वर्षभरात ३७ हजार ७३७ वाहने उचलल्याची नोंद वाहतूक विभागाकडे करण्यात आली आहे. त्यातून ७० लाख ७१ हजार ३३५ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यानुसार नो पार्किंगमधील सरासरी १०३ वाहने प्रतिदिन उचलली जातात. म्हणजेच एक टेम्पो दररोज २१ वाहने उचलतो.
2वाहतूक विभागाच्या नोंदीनुसार गेल्या वर्षी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व जूनमध्ये एकही कारवाई झालेली नाही. शिवाजीनगर, लष्करमधे ५ महिने, समर्थ २ महिने कारवाई झाली. तर, वारज्यात वर्षभरात कारवाईच झालेली नाही. स्वारगेट, सहकारनगर, विश्रांतवाडी आणि दत्तवाडीत वर्षातील ३ महिनेच कारवाई करण्यात आली.
3भारती विद्यापीठ ७ महिने, हिंजवडीत २, पिंपरी ४, भोसरी १, चिंचवड ५, खडकी २, येरवड्यात वर्षातील ८ महिने कारवाई झाली. कोंढव्यात जानेवारी २०१७ वगळता एकाही कारवाईची नोंद नाही.

माहिती अधिकारात नागरिकांना वाहन उचलल्यानंतर देण्यात आलेल्या पावत्यांच्या प्रतीची माहिती मागण्यात आली होती. ती उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.
तसेच, वाहन उचलल्यानंतर टोइंग डायरीमध्ये वाहनाची नोंद होते. त्याचीदेखील माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
ासेच, वाहन उचलल्यापोटी आकारण्यात येणाºया ५० रुपये शुल्काव्यतिरिक्त जास्त पैसे मागितल्या प्रकरणी किती जणांवर कारवाई करण्यात आली, या प्रश्नावर याबाबत एकही तक्रार दाखल झाली नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.

या प्रकरणी माहिती अधिकारात पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यात एक टेम्पो दिवसाला फक्त २१ वाहने उचलत असल्याच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रत्येक टेम्पोवर चार व्यक्ती काम करीत असतात. त्यांचे किमान वेतन कायद्यानुसार प्रतिदिन ४०० रुपयांप्रमाणे धरल्यास ते १,६०० रुपये प्रतिटेम्पो होते.

चालकाचे ६०० रुपये वेतन. म्हणजे एका टेम्पोचा दिवसाचा खर्च २,२०० रुपये होतो. नियमाप्रमाणे एका दुचाकीमागे ५० रुपये संबंधितांना मिळतात. म्हणजेच १ हजार ५० रुपये मिळवून संबंधित व्यक्ती २,२०० रुपये खर्च करीत आहे. या संशयास्पद व्यवहाराची चौकशी करावी; अन्यथा त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे त्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Tempo lift only 21 bikes a day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे