Pune | शिरकोलीमध्ये रस्त्यावर टेम्पो झाला पलटी, टेम्पोखाली चिरडून शेतकरी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 15:12 IST2023-03-31T15:09:29+5:302023-03-31T15:12:49+5:30
शिरकोली गावाच्या शेजारी असलेल्या कच्च्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली...

Pune | शिरकोलीमध्ये रस्त्यावर टेम्पो झाला पलटी, टेम्पोखाली चिरडून शेतकरी ठार
वेल्हे (पुणे) : पानशेत धरण खोऱ्यातील दुर्गम शिरकोली (ता.वेल्हे) येथे बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या पीक अप टेम्पो उलटून झालेल्या अपघातात भाऊसाहेब आबा ढेबे (४५, रा.शिरकोली) याचा चिरडून जागीच मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी (३०) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. शिरकोली गावाच्या शेजारी असलेल्या कच्च्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सरपंच अमोल पडवळ तसेच पानशेत पोलिस चौकीचे पोलिस हवालदार पंकज मोघे व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
भाऊसाहेब ढेबे हे घराचे बांधकाम करण्यासाठी पुण्यातून बांधकाम साहित्य घेऊन पीकअप टेम्पोमधून चालले होते. कच्च्या रस्त्यावर टेम्पो अचानक पलटी झाला. त्यावेळी टेम्पोमध्ये बसलेले भाऊसाहेब ढेबे हे टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्यूमुखी पडले.