पुण्यात नव्याने हजर झालेल्या पोलीस उपायुक्तांच्या 'तात्पुरत्या' नियुक्त्या; गुन्हे शाखेचे उपायुक्तही बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 07:03 PM2022-11-15T19:03:47+5:302022-11-15T19:06:36+5:30
पुणे पोलीस आयुक्तालयात बदलून आलेल्या सात पोलीस उपायुक्तांना अखेर नियुक्त्या देण्यात आल्या
पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे :- पुणे पोलीस आयुक्तालयात बदलून आलेल्या सात पोलीस उपायुक्तांना अखेर नियुक्त्या देण्यात आल्या. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश दिले आहेत. या सर्व बदल्या तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे आदेशात नमूद केले असून, त्यामुळे वेळप्रसंगी या बदल्यामध्ये बदल देखील होऊ शकतात, असे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. यापूर्वी थेट गृहविभागाकडून बदल्यांचे ऑर्डर परिमंडळानुआर होत असत. परंतु प्रथमच पुणे शहरात अशा बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे उपायुक्त बदलीचा अधिकार आयुक्तांना सढळ हाताने करता आला आहे. दरम्यान गेल्या सात दिवसापासून हे उपायुक्त बदलीनंतर शहरात दाखल झाले होते. त्यांना शहराची माहिती व वाहतूक प्रश्न याबाबत माहिती घेण्यास व त्यावरील उपाय शोधण्याबाबत सांगण्यात आले होते.
गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी अमोल झेंडे
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची बदली करण्यात आली असून, आता गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी नव्या दमाचे उपायुक्त अमोल झेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंग मॅन असणारे झेंडे यांच्याकडे खमक्या अधिकारी म्हणून पाहिले जाते.
पुण्यातील नवीन पोलिस उपायुक्त यांना देण्यात आलेले झोन
संदीप सिंह गिल्ल (पोलिस उपायुक्त - झोन १)
स्मार्तना पाटील (पोलिस उपायुक्त झोन - २)
सुहेल शर्मा (पोलिस उपायुक्त झोन - ३)
शशिकांत देवराज बोराटे (पोलिस उपायुक्त झोन - ४)
विक्रांत विश्वास देशमुख (पोलिस उपायुक्त झोन - ५)
अमोल भाऊसाहेब झेंडे (पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा)
विजय मगर, (पोलिस उपायुक्त, ट्रॅफिक विभाग)
रोहिदास पवार (पोलिस उपायुक्त झोन ५ येथून मुख्यालय)
श्रीनिवास घाडगे (पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा)