अकरावी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:17+5:302021-08-24T04:16:17+5:30
उच्च न्यायालयाने अकरावी सीईटी रद्द केल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातर्फे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली. पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील ३०८ ...
उच्च न्यायालयाने अकरावी सीईटी रद्द केल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातर्फे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली. पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील ३०८ कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी १ लाख ११ हजार १२५ जागा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती अकरावी प्रवेश समितीकडून देण्यात आली आहे.
आतापर्यंत अकरावी प्रवेशासाठी ७७ हजार २४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६८ हजार ९६६ विद्यार्थ्यांचे अर्ज भरून लॉकही झालेले आहेत. ६८ हजार ३२४ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर ५९ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले आहेत. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला आहे, त्यांनी त्यांचे नाव, जात, मार्क सर्व माहिती तात्पुरती यादीवरून कन्फर्म करून घ्यावी. त्यावरून पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर काही दुरुस्ती अथवा हरकती नोंदवायचे असेल, त्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदवावेत, असे आवाहन अकरावी प्रवेश समितीने केले आहे.