पालखी सोहळ्यानिमित्त यवत, केडगाव, पाटस स्थानकांवर रेल्वेचे तात्पुरते थांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 09:20 PM2018-07-07T21:20:16+5:302018-07-07T21:21:20+5:30
संत तुकाराम महाराज पालखीनिमित्त मध्य रेल्वेकडुन यवत, केडगाव व पाटस रेल्वे स्थानकावर काही गाड्यांना एक मिनिटांचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : संत तुकाराम महाराज पालखीनिमित्त मध्य रेल्वेकडुन यवत, केडगाव व पाटस रेल्वे स्थानकावर काही गाड्यांना एक मिनिटांचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ९ जुलै ते १२ जुलै या कालावधीत हे थांबे असतील. त्यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
पालखीनिमित्त रेल्वेकडून पहिल्यांदाच अशाप्रकारे काही गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून दि. ९ जुलै रोजी सोलापुर महामार्गाने पुढे जाणार आहे. या मार्गावरील प्रवाशांसाठी तीन स्थानकांवर गोवा एक्सप्रेस, हैद्राबाद एक्सप्रेस, पुणे-सोलापुर एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांना एक मिनिटांसाठी थांबविले जाणार आहे. दि. १२ जुलैपर्यंत या गाड्या यवत, केडगाव व पाटस या स्थानकांवर थांबतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, या मार्गावरील अन्य काही थांब्यांवरही गाड्या थांबविण्याची गरज आहे. तसेच केवळ पालखीदरम्यान थांबा देण्याऐवजी हे थांबे नियमित करायला हवेत. त्याचा अनेक प्रवाशांना लाभ होईल, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.
------------
- यवत रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या
१) वास्को द गामा-निजामुदिन गोवा एक्सप्रेस - पहाटे ४.४५
२) निजामुदिन-वास्को द गामा गोवा एक्सप्रेस - दुपारी ३.२९
३) हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस - सकाळी ८.०९
४) मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस - सायंकाळी ५.१५
-----------
- केडगाव रेल्वे स्थानकावर थांबणाºया गाड्या
१) पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस - सकाळी १०.०४
२) सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस - सायंकाळी ५.०२
----------------
पाटस रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या
१) पुणे -सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस - सायंकाळी ६.४२
२) सोलापूर- पुणे हुतात्मा एक्सप्रेस - सकाळी ९.३०