बॅट विक्रीचा मोह पडला महागात; दुकानदाराला घातला ५० हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 02:42 PM2021-07-20T14:42:20+5:302021-07-20T14:42:45+5:30
आर्मी पब्लिक स्कुलच्या नावाने २० बॅट खरेदी करावयाचे आहेत, असे सांगून गुगल पे वर लिंक पाठवून दुकानदाराला फसवले
पुणे : आर्मी पब्लिक स्कुल या शाळेसाठी २० बॅट खरेदी करायच्या आहेत, असे सांगून सायबर चोरट्याने एका दुकानदारांना ५० हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी कर्वेनगर येथील एका २२ वर्षाच्या तरुणाने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
या तरुणाचे कर्वेनगर येथे दुकानदार आहे. त्यांना १२ जुलै रोजी एक फोन आला. आरोपीने खडकी येथील आर्मी पब्लिक स्कुल मधून बोलत असल्याचे भासवून शाळेसाठी २० बॅट खरेदी करावयाचे आहेत, असे सांगून गुगल पे वर लिंक पाठवून वर व्हेरीफाय करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ती लिंक ओपन केल्यावर त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक करण्यात आली. पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.