रोटरीच्या वतीने आरोग्य उपकेंद्रांना दहा बेडची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:59+5:302021-05-31T04:08:59+5:30

शेटफळ ग्रामपंचायत यांच्या वतीने चालवत असलेल्या कोविड विलगीकरण कक्षाला व अकोले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला बेडची आवश्यकता होती म्हणून ...

Ten beds donated to health sub-centers on behalf of Rotary | रोटरीच्या वतीने आरोग्य उपकेंद्रांना दहा बेडची मदत

रोटरीच्या वतीने आरोग्य उपकेंद्रांना दहा बेडची मदत

Next

शेटफळ ग्रामपंचायत यांच्या वतीने चालवत असलेल्या कोविड विलगीकरण कक्षाला व अकोले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला बेडची आवश्यकता होती म्हणून दहा बेड मदत स्वरूपात भेट देण्यात आले,अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर यांनी दिली.

ग्रामपंचायत शेटफळ व आरोग्य उपकेंद्र यांनी मिळून स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. त्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून सात बेड रोटरी क्लब ऑफ भिगवण व रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने भेट देण्यात आले.

या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर, सचिव रणजित भोंगळे, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, असिस्टंट गव्हर्नर रियाज शेख, महेश शेंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ग्रामपंचायत शेटफळच्या ग्रामविकास अधिकारी बी. डी. काळे, संतोष वाबळे, उपसरपंच अजित कुंभार, सोमनाथ सवाणे, राहुल वाबळे, पिंटू धुमाळ , बापू वाबळे यांनी रोटरी सदस्य औदुंबर हुलगे, प्रदीप ताटे, संतोष सोनवणे, अकबर तांबोळी, संजय चौधरी, नामदेव कुदळे, कमलेश गांधी, संजय खाडे, मनोज राक्षे या सर्वांचा सत्कार केला.

तसेच अकोले येथे कार्यक्रमाला समुदाय आरोग्य अधिकारी

पल्लवी साळुंखे, जीवन चांदगुडे व एस. ए. शहागडकर, सरपंच सोमनाथ दराडे, उपसरपंच संदीप दराडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश खाडे, बबन सोलनकर,अनिल शिंदे, गौरीहर दराडे, बाळुबाई,पडळकर, रोहिणी जगताप, रूपाली कोकरे, मनीषा दराडे, कमलाकांत वणवे, खंडू शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

२६अकोले

अकोले व शेटफळगढे आरोग्य केंद्राला रोटरी क्लबच्या वतीने बेडचे वाटप करण्यात आले.

===Photopath===

260521\502026pun_8_26052021_6.jpg

===Caption===

२६अकोलेअकोले व शेटफळगढे आरोग्य केंद्राला रोटरी क्लबच्या वतीने बेडचे वाटप करण्यात आले.

Web Title: Ten beds donated to health sub-centers on behalf of Rotary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.