दहा दिवसांत पोलिसांना शरण जा ; सर्वोच्च न्यायालयाचा मानकरांना आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:11 PM2018-07-23T14:11:50+5:302018-07-23T14:23:31+5:30

जितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जगताप यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हंटले होते.

In ten days go to the police; Supreme Court orders for Mankar | दहा दिवसांत पोलिसांना शरण जा ; सर्वोच्च न्यायालयाचा मानकरांना आदेश 

दहा दिवसांत पोलिसांना शरण जा ; सर्वोच्च न्यायालयाचा मानकरांना आदेश 

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळलातीन खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता

पुणे : माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळला आहे. तसेच पुढील १० दिवसांत त्यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. 
   सलग तीन उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनावर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवल्याने मानकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मानकर यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यास सुरुवातीला न्यायमूर्ती साधना जाधव यांनी असमर्थता दर्शवल्याने त्यांच्याकडून अर्ज दुसºया न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार १५ जून रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या न्यायालयात अर्ज करण्याला होता. मात्र, त्यांच्या खंडपीठाने देखील याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली होती. त्यानंतर मानकर यांनी तिसºया खंडपीठापुढे याचिका सादर केली होती. परंतु, त्याही खंडपीठाने सुनावणीस घेण्यास नकार दिला होता. 
     मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्याजितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जगताप यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हंटले होते. त्यामुळे पोलिसांनी जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०,रा़ जयभवानी नगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़  शांतीनगर येरवडा), कुख्यात गुंड नाना कुदळे (रा़  केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक करण्यात आली होती. तर मानकर आणि कर्नाटकी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातून अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मानकर यांनी सर्वप्रथम शिवाजीनगर येथील न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र तीन खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली होती.  

Web Title: In ten days go to the police; Supreme Court orders for Mankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.