पटसंख्येअभावी पालिकेच्या दहा शाळाचे विलीनीकरण होणार; सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव
By राजू हिंगे | Published: July 19, 2024 03:26 PM2024-07-19T15:26:13+5:302024-07-19T15:26:45+5:30
शाळाचे विलीनीकरण केल्याने कोणतीही शाळा बंद होणार नाही तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही
पुणे : पुणे महापालिकच्या मराठी माध्यमाच्या पाच शाळा , इंग्रजी माध्यमांच्या दोन शाळा, उर्दु माध्यम शाळा तीन अशा एकुण दहा शाळांची पट संख्या १५० पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे या दहा शाळाचे त्याच इमारतीत किंवा नजीकच्या शाळेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.
पुणे महापालिकेच्या प्राथमिक विभागाकडील शाळा एका इमारतीत पण सकाळी आणि दुपारच्या सत्रात भरत आहेत. त्यामुळे या शाळामधील पटसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनामध्ये अडचणी येत आहेत. पटसंख्या कमी झाल्याने राज्यसरकारने मान्य केलेल्या संच मान्यतेमध्ये १ ते ८ वीच्या आठ तुकडयांना स्वतंत्रपणे आठ शिक्षक मान्य होत नाहीत. त्या ठिकाणी शिक्षकांना जोड वर्ग घ्यावे लागतात. त्यामुळे विधाथ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सघस्थितीत पटसंख्या कमी झालेल्या काही शाळामधुन जे शिक्षक कार्यरत आहेत. ते कमी पटसंख्येमुळे अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे एका इमारतीत सकाळ आणि दुपारच्या सत्रातील शाळाची पटसंख्या १५० पेक्षा कमी असल्याने त्यांना मुख्याध्यापक पद मान्य होत नाही. त्यामुळे या दोन्ही शाळा एकत्र केल्यास शाळेचा पट वाढुन मुख्याध्याकपद मान्य होईल. शाळाचे विलीनीकरण केल्याने कोणतीही शाळा बंद होणार नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. शाळेत सकाळी सात वाजता विधार्थी उपस्थित राहण्याचे प्रमाणत अत्यंत कमी आहे. त्यामुळे शाळाचे विलीनीकरण केल्यास इमारतीचा पुर्णवेळ वापर करता येणार आहे. तसेच अध्यापनाच्या तास वाढविता येणार आहे.
दहा शाळाचे विलीनीकरण केल्यास एकुण ८ बालवाडी शिक्षिका, ८ बालवाडी सेविका, ८ शिपाई, १ रखवालदार यांची पदी अन्य शाळावर बदलीने समायोजन करता येणार आहे. तसेच अतिरिक्त ठरलेले मुख्याध्यापक , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा०याची बदली करून समायोजन केले जाणार आहे.