ओतूर परिसरात गुरुवारी दहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:30+5:302021-08-27T04:15:30+5:30
या पैकी २ हजार ८७२ बरे झाले आहेत. ५३ जण कोविड सेंटर तर २३ जण घरातच उपचार ...
या पैकी २ हजार ८७२ बरे झाले आहेत. ५३ जण कोविड सेंटर तर २३ जण घरातच उपचार घेत आहेत. ११४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते व डॉ. शेखरे दिली. ओतूर शहरात ५ रुग्ण सापडले. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या १ हजार २८७ झाली आहे. यापैकी १ हजार २२२ बरे झाले आहेत. १५ कोविड सेंटर तर ९ जण घरीच उपचार घेत आहेत. ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे येथील ३ रुग्णांमुळे येथील संख्या ३०९ झाली आहे. त्यातील २८८ रुग्ण बरे झाले आहेत. ९ रुग्ण उपचार घेत आहेत तर, १२ जणांचा मृत्यू आहे. हिवरे खुर्द येथील १३३ पैकी ११५ रुग्ण बरे झाले आहेत. ११ रुग्ण उपचार घेत आहेत. ७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. सारोक्ते, डॉ. शेखरे यांनी दिली.