वीज धक्क्याने सहा महिन्यांत दगावले 10 जण

By admin | Published: December 10, 2014 12:14 AM2014-12-10T00:14:21+5:302014-12-10T00:14:21+5:30

महावितरणच्या पुणो परिसरातील 1 वायरमनला (तारतंत्री) गेल्या 6 महिन्यात जीव गमवावा लागला असून 12 कर्मचारी जखमी झाले आहेत.

Ten people were tormented by electricity in six months | वीज धक्क्याने सहा महिन्यांत दगावले 10 जण

वीज धक्क्याने सहा महिन्यांत दगावले 10 जण

Next
पिंपरी : दुस:याच्या घरात उजेड करण्यासाठी जीवाचे रान करून धडपडणा:या महावितरणच्या पुणो परिसरातील 1 वायरमनला (तारतंत्री) गेल्या 6 महिन्यात जीव गमवावा लागला असून 12 कर्मचारी जखमी झाले आहेत. यासह 9 नागरिक अपघातात दगावले असून 13 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती महावितरणच्या सूत्रंकडून मिळाली आहे. सुरक्षा साधनांची कमतरता,  अनेकदा दुस:याच्या चूकीमुळे धोकादायक स्थितीमुळे कित्तेक जणांना अपंगत्वास सामोरे जावे लागले असून कामगारांचा जीव टांगणीस लागला आहे. 
सध्या वीज हा कळीचा मुद्दा ठरत आहे. आधिच असणा:या भारनियमनाने लोकत्रस्त आहेत. मिळणा:या वेळेतही वारंवार खंडीत होणा:या वीजपुरवठय़ामुळे तो सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या विशेषत: वायरमन व त्यांच्या सहका:यांवर सर्वाधिक ताण असतो. कार्यक्षेत्र आहे तीतकेच दिसत असले तरीही वीजजोडांचेप्रमाण प्रचंड वाढले आहे. मुख्य वाहिणी तसेच घरघुती जोडांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचा:यांना सतत धावपळ करावी लागते. अनेकदा वीजपुरवठा बंद करण्याची परवानगी घेवूनही काम करताना केवळ दुस:याच्या चुकीमुळे विद्युत प्रवाह सुरू केला गेल्यास वीजेचा धक्का लागल्याने जीव जाणारांचे अथवा खांबावरून पडून अपंगत्व येणारांचे प्रमाण 4क् पेक्षा अधिक आहे.
राज्य वीज मंडळाचे विभाजन झाल्यापासून कंत्रटी पद्धतीने अनुभवी कर्मचा:यांनीही नोकरी करण्या एैवजी इतर खासगी उद्योग क्षेत्रंना पसंती दिली आहे. परिणामी सध्या महावितरणचा डोलारा हा नवशिक्या वायरमनवर अवलंबून आहे. जुन्या वायरमनलाखांबावर चढता येत नसल्याने काही वायरमन नवशिक्या पोरांकडून, स्वत: सांगून काम करवून घेत असल्याचे प्रकारही सुरू आहेत. त्यातच अशा पोरांकडून बेजबाबदारपनेकामे सुरू आहेत. सुरक्षा बेल्टविनाच खांबावर चढणो, वीज प्रवाह सुरू असतानाच काम करणो, काम करताना मोबाईलवर बोलणो असे प्रकार अपघातांना निमंत्रण देत आहेत.
 
सुरक्षासाधनांची वानवा
4वायरमनला महावितरणकडून पुरविण्यात येणा:या सुरक्षा साधनांची वाणवा आहे. पोषाखाचा सुरक्षादृष्टीने उपयोगाबाबत साशंकता आहे. रबरी हातमोज्यांची कमतरता असते. खांबावरून पडू नये म्हणून कमरेला लावण्याचा पट्टाही सदोष असून, त्यांचीही कमतरता आहे. वीजप्रवाह सुरू आहे, की बंद हे विसंवादाने अनेकदा न समजल्याने अपघात होतात. त्यामुळे संवादयंत्रणा सक्षम करणो गरजेचे असल्याची भावना कर्मचारी व्यक्त करतात.
 
कर्मचा:यांच्या प्रशिक्षणावर भर
अनेक कर्मचा:यांना होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा कायम प्रय} आहे. त्याचाच भाग म्हणून कर्मचा:यांना सुरक्षा उपाय योजनांबाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. आहे ती सुरक्षा साधने पुरेशी आहेत. त्यांचा वापर प्रभावीपने करण्याची गरज आहे. आपला जीव महत्वाचा असून त्यासाठी वीजप्रवाह खंडीत करणा:या डिस्चार्ज रॉडचा वापर करण्याच्या स्पष्ट सूचना प्रत्येक कर्मचा:यास दिल्या आहेत.
- निळकंठ वाडेकर, मुख्य अभियंता, महावितरण, पुणो विभाग
 
अनेकदा वीजेचा खांब व ग्राहकाला दिला जाणारा वीजजोड यामधील अंतर अधिक असल्याने कामगारांकडून चालू वीज प्रवाहातच वीज जोड देणो, अथवा दुरूस्तीची कामे करण्याचा प्रय} होतो. अशावेळी विशेषत: पावसाळ्यात ओलाव्यामुळे वीजेचा धक्का लागून अपघात होत आहेत.

 

Web Title: Ten people were tormented by electricity in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.