चैतन्य पतसंस्थेकडून सभासदांना दहा टक्के लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:10+5:302021-03-31T04:12:10+5:30
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मर्यादित सभासदांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेमध्ये सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेचे ...
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मर्यादित सभासदांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेमध्ये सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेचे संस्थापक विनायक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने सभासदांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र चालू केलेले आहे तसेच सोनेतारण कर्ज, वाहन तारण कर्ज अल्प व्याजदरात उपलब्ध केले आहे. सामाजिक कार्यामध्ये संस्थेने भरीव कार्य केले असून यामधे गावचे दशक्रिया विधी जागेचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम देखील पूर्ण केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष भास्कर डुंबरे म्हणाले की, सभासदांचा संस्थेवरील विश्वास वाढला असून यामुळे ठेवींमधे देखील भरघोस वाढ झालेली आहे सध्या संस्थेचे भाग भांडवल ७७.८१ लाख,निधी १ कोटी २६ लाख,ठेवी ७ कोटी १५ लाख असून येणे कर्ज पाच कोटी आहे संस्थेला झालेला नफा १० लाख एकवीस हजार आठशे सतरा रुपये असल्याचे अध्यक्ष भास्कर डुंबरे यांनी सांगितले. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. गोरख पानसरे यांनी सूत्रसंचालन केले तर सहसचिव भिवाजी माळवे यांनी आभार मानले.
--
फोटो ३० ओतूर विद्यमाने
फोटो ओळी : चैतन्य पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष भास्कर डुंबरे सभासदांना माहिती देताना.