चिव्हेवाडी शाळेस दहा टॅब भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:53+5:302021-05-17T04:09:53+5:30

या भागात नेटवर्क नसल्याने ऑफलाइन पद्धतीने अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आल्याचे इस्कॉन संस्थेचे स्वेदद्वीप प्रभुजी यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थी ...

Ten tab visit to Chiwewadi school | चिव्हेवाडी शाळेस दहा टॅब भेट

चिव्हेवाडी शाळेस दहा टॅब भेट

Next

या भागात नेटवर्क नसल्याने ऑफलाइन पद्धतीने अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आल्याचे इस्कॉन संस्थेचे स्वेदद्वीप प्रभुजी यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थी गुणवत्तेत निश्चितच भर पडणार आहे. याशिवाय शाळेस आतापर्यंत सुमारे सात लाख रुपयांचा लोकसहभाग शाळेने मिळवल्याचे व विद्यार्थ्यांना भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याचे मुख्याध्यापिका सुवर्णा इंदलकर यांनी सांगितले.

कार्यक्रमप्रसंगी गावचे सरपंच दीपक चिव्हे, माजी मुख्याध्यापक ज्ञानोबा इंदलकर, डॉ. जनार्दन चितोंडे, संजय भोसले, वर्षा भोसले, भक्ती भोसले, तनिका बांदल, सुजित भोगळे व शिक्षक वृंद उपस्थित होते.

यासाठी मोलाचे मार्गदर्शन पुरंदर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी मोहन गायकवाड व केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सुवर्णा इंदलकर, सहशिक्षिका प्रतिभा दळवी, रिमा अद्वैत, जयश्री मेमाणे, योगेश बनकर यांनी केले. सूत्रसंचालन योगेश बनकर यांनी केले.

चिव्हेवाडी (ता. पुरंदर) येथे इस्कॉन संस्थेडून मिळालेल्या टॅबवाटपप्रसंगी मान्यवर.

Web Title: Ten tab visit to Chiwewadi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.