देशात दहा हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर येणार हवाईमार्गे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:49+5:302021-04-27T04:10:49+5:30
पिंपरी : देशातील ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी तब्बल दहा हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणण्यात येणार आहेत. त्यातील आठशे कॉन्सन्ट्रेटर हाँगकाँगवरून ...
पिंपरी : देशातील ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी तब्बल दहा हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणण्यात येणार आहेत. त्यातील आठशे कॉन्सन्ट्रेटर हाँगकाँगवरून दिल्लीत दाखल झाले आहेत.
कोरोनाबाधितांची (कोविड १९) संख्या वाढत असल्याने देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजन निर्यात करण्याची घोषणा केंद्र सरकरने या पूर्वीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातील विविध ठिकाणावरून ऑक्सिजन आणण्यात येत आहे.
स्पाईस जेटचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग म्हणाले, हॉंगकॉंगवरून आठशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणण्यात आले असून, येत्या काही दिवसांत दहा हजार कॉन्सन्ट्रेटर आणण्याचे नियोजन आहे. कोरोना काळात भाज्या आणि फळे, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची वाहतूक केली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीत ३ कोटी ४० लाख कोविड लशींची वाहतूक केली आहे. मार्च २०२० पासून दीड लाख टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे. औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची देशातील पुरवठा साखळी अबाधित राखण्यासाठी त्याची मदत झाली.
औषधांची सुरक्षित वाहतूक हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. अशा औषधांचा पुरवठा करण्यासाठी उणे चाळीस आणि २५ अंश सेल्सिअस तापमान राखावे लागते, असे सिंग यांनी स्पष्ट केले.