दहा हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By admin | Published: September 4, 2016 04:17 AM2016-09-04T04:17:32+5:302016-09-04T04:17:32+5:30

यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल दहा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून या वेळी साडेचार हजार सार्वजनिक गणेश

Ten thousand police custody settlements | दहा हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

दहा हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Next

पुणे : यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल दहा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून या वेळी साडेचार हजार सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेतलेली आहे. गणेश प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकांदरम्यान ढोल-ताशा पथके असोत अथवा स्पीकर असोत, सर्वांनी आवाजाची मर्यादा पाळणे बंधनकारक असून, ही मर्यादा ओलांडल्यास मंडळांसह संबंधित पथकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, समन्वयासाठी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पोलिसांनी केलेल्या नियोजनाची माहिती शुक्ला यांनी दिली. या वेळी सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरीक्त आयुक्त (गुन्हे) सी. एच. वाकडे, परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ, श्रीकांत पाठक, पंकज डहाणे, गणेश शिंदे उपस्थित होते. पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठे महत्त्व असून, राज्यातील मानाचा हा उत्सव आहे. गणेश मंडळांसह ढोलताशा पथकांच्या यापूर्वीच बैठका घेण्यात आलेल्या आहेत. नोंदणी झालेल्या ४ हजार ४१९ मंडळांमार्फत गणेशाची स्थापना होणार आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवण्यात येत आहे. गणेश मुर्तीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता, अशा भागातील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. विसर्जन घाटांची पाहणी पूर्ण झाली असून खास उत्सवासाठी ११३ नवीन सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आल्याचे शुक्ला यांनी सांगितले. शहराच्या विविध भागांमध्ये एकूण तेरा रुग्णवाहिका आणि फरासखाना, तसेच पुरम चौकामध्ये छोट्या रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवादरम्यान कोणताही विशेष ‘अलर्ट’ आलेला नाही. महत्त्वाच्या गणपतींच्या मंडपांभोवतीही यंदा विशेष बंदोबस्त लावण्यात येणार आहे. दर्शन रांगेला बॅरीगेटींग आणि मेटल डिटेक्टर लावण्यात येणार आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी एकूण ६२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आणखीही काही जणांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. शेवटचे पाच दिवस जरी स्पीकरला रात्री बारापर्यंत परवानगी असली, तरीदेखील आवाजाची मर्यादा (डेसीबल) मात्र बंधनकारक आहे. पोलिसांकडे पुरेसे नॉइल लेवल मीटर आहेत. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे असे शुक्ला म्हणाल्या.

विविध पथके तैनात
गणेशोत्सवादरम्यान पुण्यात १४६ डेसिबलच्यावर आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
उत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी दोन अतिरीक्त आयुक्त, १६ उपायुक्त, ४० सहायक आयुक्त, १७० पोलीस निरीक्षक, ६०० सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक, ८ हजार पोलीस कर्मचारी यांच्यासह बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना
गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी.
हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशाचे पालन करावे.
प्रत्येक मंडळाने चोवीस तास कमीत कमी दहा स्वयंसेवक नेमावेत.
मंडळाच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.
मंडळासमोर वाजविण्यासाठी ढोल-ताशा पथकाला परवानगी घेणे आवश्यक.
पथकांनी नेमून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त ढोलताशे वापरू नयेत.

नागरिकांसाठी सूचना
गर्दीमध्ये येताना मौल्यवान वस्तू घालून येणे टाळावे.
लहान मुलांची काळजी घ्यावी.
बेवारस वस्तू आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.
चेंगराचेंगरी होईल, असे वर्तन करूनये.

महत्त्वाच्या गणपतींच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये; तसेच पुढची आणि मागची वाहतूक सुरळीत चालावी, याकरिता यंदा ‘जीपीएस’ सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. गणेशाच्या रथाला जीपीएस डिव्हाइस जोडले जाणार आहे. त्याचे मॉनिटरिंग पोलिसांमार्फत केले जाणार आहे. त्यामुळे मिरवणुकीचे नेमके ‘लोकेशन’ पोलिसांना समजणार आहे. दोन मिरवणुका एकमेकांना आडव्या येणार नाहीत; तसेच गर्दीमुळे अडथळा होणार नाही, याचीही दक्षता या जीपीएसमुळे घेणे सोपे जाणार आहे. पुण्यामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग राबविण्यात येत असून, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
- सुधीर हिरेमठ, उपायुक्त, परिमंडल एक

Web Title: Ten thousand police custody settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.