ट्रकचालकांना लुटणा-या तीन दरोडेखोरांना दहा वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:16+5:302021-06-20T04:08:16+5:30

पुणे : ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून लुटणा-या तीन दरोडेखोरांना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी साडेदहा लाख रुपयांचा दंड ...

Ten years hard labor for three robbers who robbed truck drivers | ट्रकचालकांना लुटणा-या तीन दरोडेखोरांना दहा वर्षे सक्तमजुरी

ट्रकचालकांना लुटणा-या तीन दरोडेखोरांना दहा वर्षे सक्तमजुरी

Next

पुणे : ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून लुटणा-या तीन दरोडेखोरांना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी साडेदहा लाख रुपयांचा दंड सुनावला. दंडाची रक्कम न भरल्यास दोषींना आणखी अडीच वर्षांचा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

विजय ऊर्फ विज्या बिभीषण काळे, बाजीगर ऊर्फ बि-या वाघमन्या काळे, उद्देश बिभीषण काळे (सर्व रा. सरस्वतीनगर, इंदापूर) यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री तीन ते सव्वातीनच्या दरम्यान सोरतापवाडी (ता. हवेली, पुणे) येथे हा गुन्हा घडला. त्या दिवशी गणेश शिंदे, रामधारी यादव, धनंजय पोनकालापाडू, रावसाहेब शेजाळ, रवी कोटी, राहुल सिंग हे ट्रकचालक आपले ट्रक सोरतापवाडी येथील पेट्रोल पंपाच्या मागे मोकळ्या जागेत लावून ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते. या वेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून गणेश शिंदे यांच्या उजव्या खांद्यावर व डोळ्यावर मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी ट्रकचालकांकडून ६६ हजार रुपये रोख, तसेच सोन्याचे दागिने, मोबाइल आदी ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विजय ऊर्फ विज्या बिभीषण काळे, बाजीगर ऊर्फ बि-या वाघमन्या काळे, उद्देश बिभीषण काळे या टोळीने आतापर्यंत २६ गंभीर गुन्हे केले आहेत, असे पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात नमूद आहे. त्यामध्ये आरोपी आणि त्यांच्या दोन साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत ठपका ठेवण्यात आला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी काम पाहिले.

.....................................

Web Title: Ten years hard labor for three robbers who robbed truck drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.