पुणे होरपळतेय : दहा वर्षातील उच्चांकी तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:29 PM2019-04-26T12:29:22+5:302019-04-26T12:34:39+5:30

यापूर्वी ३० एप्रिल २००९ रोजी पुण्यात 41.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती़ तर ३० एप्रिल १८९७ रोजी पुणे शहरात 43.3 अंश सेल्सिअस इतके आजवरच उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले होते़ .

Ten years of high temperature in Pune | पुणे होरपळतेय : दहा वर्षातील उच्चांकी तापमान

पुणे होरपळतेय : दहा वर्षातील उच्चांकी तापमान

googlenewsNext

पुणे : रात्रीच्या तापमानाबरोबर शहरात गुरुवारी गेल्या दहा वर्षातील उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे़. गुरुवारी शहरात 41.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे़. यापूर्वी ३० एप्रिल २००९ रोजी पुण्यात 41.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती़ तर ३० एप्रिल १८९७ रोजी पुणे शहरात 43.3 अंश सेल्सिअस इतके आजवरच उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले होते़ .

पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून तापमानात वाढ होत आहे़. मंगळवारी शहरात 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती़. त्यात बुधवारी आणखी वाढ होऊन कमाल तापमान 41.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़. त्यात आणखी वाढ होऊन गुरुवारी कमाल तापमान 41.6अंश सेल्सिअसवर पोहचले आहे़ .

गुरुवारी सकाळी किमान तापमान 25.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़.  ते सरासरीच्या तुलनेत 46 अंशाने अधिक होते़ सकाळपासूनच सूर्य आग ओकल्यासारखा होता़.  सूर्य जसा डोक्यावर येऊ लागला तशी अंगाची लाहीलाही होऊ लागली होती़. पुढील दोन दिवसात शहरातील कमाल तापमान ४२ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे़. 

गेल्या १० वर्षातील एप्रिलमधील उच्चांकी कमाल तापमान

२८ एप्रिल २०१८ 40.04

१८ एप्रिल २०१७ 40.08

२७ एप्रिल २०१६ 40.9

२७ एप्रिल २०१५ 40

३० एप्रिल २०१४ 40.7

३० एप्रिल २०१३ 41.3

९ एप्रिल २०१२ 39.9

२९ एप्रिल २०११ 39.7

१७ एप्रिल २०१० 41.6

३० एप्रिल २००९ 41.7

Web Title: Ten years of high temperature in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.