पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी

By नम्रता फडणीस | Published: August 4, 2022 08:10 PM2022-08-04T20:10:25+5:302022-08-04T20:19:56+5:30

शिक्षा झालेल्या आरोपी हा बीड जिल्ह्यातील....

Ten years of hard labor for a young man who molested a minor girl in Pune | पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी

Next

पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला विशेष न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गणेश सखाराम कदम (वय २७, रा. तळवडे, मूळ रा. ढाळेवाडी, ता. पाटोदा, बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आराेपीवर बलात्कार आणि पॉक्सो कायद्याच्या कलमान्वये चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला हाेता. सदर घटना २१ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास तळवडे परिसरात घडली हाेती. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून आधी पंढरपूर व नंतर शिर्डीला नेले. तिथे लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला पाटोदा बसथांब्यावरून ताब्यात घेतले हाेते. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी गणेश विरोधात दोषारोपपत्र सादर केले.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. चिखली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नीलेश दरेकर यांनी न्यायालयीन कामकाजात साह्य केले.

Web Title: Ten years of hard labor for a young man who molested a minor girl in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.