बलात्काराच्या गुन्ह्यात दहा वर्षांची शिक्षा

By admin | Published: December 24, 2016 12:07 AM2016-12-24T00:07:40+5:302016-12-24T00:07:40+5:30

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार केलेल्या बलात्कारप्रकरणी आरोपी तरुणाला बाललैंगिक

Ten years of punishment in the crime of rape | बलात्काराच्या गुन्ह्यात दहा वर्षांची शिक्षा

बलात्काराच्या गुन्ह्यात दहा वर्षांची शिक्षा

Next

राजगुरुनगर : अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार केलेल्या बलात्कारप्रकरणी आरोपी तरुणाला बाललैंगिक अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यात १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा, येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी ठोठावली. आळंदी येथे गेल्या वर्षी हा गुन्हा घडला होता.
लक्ष्मण दिलीप देशमुख (वय २४, रा. जराळा, ता. परतूर, जि. जालना, हल्ली रा. आळंदी, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. आळंदी या तीर्थक्षेत्री आळंदी-मरकळ रस्त्यालगत संतोषी माता मंदिरामागील तत्कालीन नगरसेवक अशोक कांबळे यांच्या चाळीत फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि आरोपी लक्ष्मण देशमुख राहत होते.
मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनसुद्धा तिच्याशी मैत्री करून आणि तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर, तिच्या घरात कोणी नसताना, गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत बलात्कार केला. तसेच, २२ मार्च रोजी फिर्यादी एकटी असताना जबरदस्तीने तिला स्वत:च्या खोलीत ओढून नेऊन बलात्कार केला. मात्र, त्या वेळी फिर्यादीच्या वडिलांची चाहूल लागल्याने तिला खोलीत कोंडून तो निघून गेला. यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळचे सहायक पोलीस निरीक्षक के. आर. कदम आणि पोलीस हवालदार डी. एस. मांडे यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. राजगुरुनगर न्यायालयात हा खटला सुरू होता. सरकारी वकील गिरीश कोंबल यांनी या खटल्यात ५ साक्षीदार तपासले. त्यांमध्ये पीडित फिर्यादी मुलगी, तिची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि तिचे वडील यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंड व तो न भरल्यास ३ महिने कारावास, कलम ४५० नुसार ५ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड व तो न भरल्यास १ महिना कारावास, कलम ३४२ अन्वये १ वर्ष सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड व तो न भरल्यास १ महिना कारावास, अशी शिक्षा ठोठावली.

Web Title: Ten years of punishment in the crime of rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.