पासवर्डचा गैरवापर करून टेंडरची माहिती ‘लिक’
By admin | Published: December 9, 2015 12:27 AM2015-12-09T00:27:41+5:302015-12-09T00:27:41+5:30
महापालिकेमध्ये आॅनलाइन पद्धतीने आलेले टेंडर उघडण्याचा की वर्ड व पासवर्ड केवळ महापालिका आयुक्त व टेंडर सेलच्या प्रमुखांकडेच असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात
पुणे : महापालिकेमध्ये आॅनलाइन पद्धतीने आलेले टेंडर उघडण्याचा की वर्ड व पासवर्ड केवळ महापालिका आयुक्त व टेंडर सेलच्या प्रमुखांकडेच असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ते आॅपरेटरकडे देण्यात आल्याने त्याचा गैरवापर करून टेंडरची माहिती फोडली जात आहे. त्या माहितीच्या आधारे टेंडरचे रिंग केले जात असल्याचा आरोप भाजपाचे स्थायी समिती सदस्य राजेंद्र शिळीमकर यांनी केला आहे.
टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, म्हणून त्या आॅनलाइन पद्धतीने भरल्या जात आहेत.
टेंडरचे रिंग करण्याच्या प्रकाराला आळा बसावा, म्हणून आॅनलाइन पद्धत आणली गेली.
मात्र प्रत्यक्षात त्याचा कीवर्ड व पासवर्ड आॅपरेटर्सनादेखील माहीत झाल्याने त्याचा गैरवापर होत आहे. टेंडर भरण्याची मुदत संपल्यानंतरही टेंडर दाखल केले जात असल्याचे शिळीमकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये शिळीमकर यांनी टेंडर सेलबाबात प्रश्न
उपस्थित केले. त्या वेळी
संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे
त्यांना याबाबत माहिती मिळू
शकली नाही. आॅनलाइन टेंडर भरण्याची मुदत संपल्यानंतर की व पासवर्डचा वापर करून किती रकमेचे टेंडर आले आहेत, याची माहिती घेतली जाते.
त्यानंतर त्या माहितीच्या आधारे पसंतीच्या ठेकेदारांकडून टेंडर भरले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये भरण्यात आलेल्या टेंडरची सर्व माहिती प्रशासनाकडून मागविली असल्याचे शिळीमकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)