करदात्यांच्या विम्याची निविदा रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 03:10 AM2019-04-01T03:10:03+5:302019-04-01T03:10:30+5:30

महापालिकेची पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना

Tender notice of taxpayer's insurance | करदात्यांच्या विम्याची निविदा रखडली

करदात्यांच्या विम्याची निविदा रखडली

Next

पुणे: जास्तीत जास्त पुणेकरांनी नियमित कर भरावा यासाठी महापालिकेकडून करदात्यांसाठी खास अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. परंतु अपघात विमा योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या विमा कंपनीची नियुक्तीची निविदा प्रक्रियाच न राबविल्याने शहरातील लाखो प्रामाणिक करदाते विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे.

महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आपल्या पहिल्या अंदाजपत्रकामध्ये नियमित कर भरणाऱ्या करदात्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर सन २०१८-१९ मध्ये योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करण्यात आली. या योजनेअतंर्गत ज्याच्या नावावर मिळकत असेल व नियमित मिळकत कर भरणाऱ्या करदात्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपघाताने कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला तब्बल ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. पहिल्याच वर्षी केवळ १५ करदात्यांना विमा योजनेचा लाभ झाला आहे. महापालिकेच्या वतीने सन २०१८-१९ या वर्षांसाठी निविदा काढून न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीशी करार करण्यात आला होता. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ साठी ही योजना लागू राहणार होती. यामुळे ३१ मार्चपर्यंत कर भरणाºया व्यक्तींना योजनेचा लाभ मिळणार आहे.

नावावर मिळकत असणाºयाला लाभ : लाखो पुणेकरांना फटका

महापालिकेच्या वतीने सुरू केलेल्या योजनेचा लाभ पहिल्या वर्षी केवळ ज्या व्यक्तींच्या नावावर मिळकत आहे त्यालाच मिळत होते. परंतु आता संपूर्ण कुटुंबाला विमा योजनेचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु ही प्रक्रिया वेळेत सुरु न केल्याने अद्याप नवीन कंपनी निश्चित झाली नाही.

त्यात आता लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली असून, २७ मे पर्यंत निविदा प्रक्रिया राबविता येणार नाही. यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून विमा योजना लागू होण्यासाठी जून-जुलै उजाडणार आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पासून मिळकत कर भरणाºया पुणेकरांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका प्रशासनाच्या या कारभाराचा फटका लाखो पुणेकरांना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करू
महापालिकेच्या वतीने करदात्यांसाठी सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेमध्ये काही बदल केले असून, आता संपूर्ण कुटुंबाला विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने निविदा प्रक्रिया रखडली आहे. यामुळेच निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी कर भरणाºया सर्व करदात्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येतील.
- रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख

Web Title: Tender notice of taxpayer's insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.