कोमटी समाज रोजगार देणारा
By admin | Published: November 24, 2015 01:09 AM2015-11-24T01:09:48+5:302015-11-24T01:09:48+5:30
कोमटी समाज हा रोजगार घेणारा नाही, तर रोजगार देणारा समाज आहे. व्यापार आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या समाजासाठी व राज्याच्या देशाच्या विकासासाठी मोठ्या
पुणे : कोमटी समाज हा रोजगार घेणारा नाही, तर रोजगार देणारा समाज आहे. व्यापार आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या समाजासाठी व राज्याच्या देशाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती कोमटी समाजाकडून
झाली पाहिजे, अशी अपेक्षा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
आर्य वैश्य समाजातील
व्यक्ती राज्याच्या अर्थमंत्रिपदापर्यंत पोहोचून राज्याचे नेतृत्व करते ही समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे. यामुळे महाराष्ट्र आर्य वैश्य
महासभा व आर्य वैश्य कोमटी समाज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुनगंटीवार यांचा या समाजातील शंभरपेक्षा जास्त नागरिकांनी हार घालून भव्य सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मुनगंटीवार बोलत होते.
या वेळी आर्य वैश्य कोमटी समाजाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कोले, किशोर पारसेवार, महिला मंडळ अध्यक्ष रूपाली दमकोडवार, भानुदास वट्टमवार आदी मान्यवर उपस्थित होते. कोमटी समाजाच्या अनेक समस्या या वेळी मुनगंटीवार यांच्यासमोर मांडण्यात आल्या.
समाजातील लोकांनी जास्तीत जास्त श्रीमंत होऊन राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कर दिला पाहिजे. कोमटी समाज लोकसंख्येच्या मानाने जरी कमी असला, तरी जेवणात जशी मिठाची गरज असते तशी राज्याच्या विकासासाठी कोमटी समाजाची आवश्यकता सगळ््यांना भासली पाहिजे. पुढील पाच वर्षांत समाजाच्या जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचे आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिले.