कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याबाबत चिंता; विल्हेवाट लावण्यासाठी हवेत प्रशिक्षित कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 07:43 PM2020-04-08T19:43:50+5:302020-04-08T19:49:15+5:30

शहरवासीयांकडून या कचऱ्याबाबत चिंता व्यक्त; खबरदारी घेणे आवश्यक

Tension about biomedical waste becaused by corona; Require of trained personnel for disposal | कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याबाबत चिंता; विल्हेवाट लावण्यासाठी हवेत प्रशिक्षित कर्मचारी

कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याबाबत चिंता; विल्हेवाट लावण्यासाठी हवेत प्रशिक्षित कर्मचारी

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाग्रस्त व संशयित रुग्णांवर उपचार करताना जैववैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात तयारनिर्माण होणाऱ्या कचऱ्याची हाताळणी, प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्याच्या मार्गदर्शक सूचना

पिंपरी : शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो. या कचऱ्याचे संकलन तसेच त्याची विल्हेवाट लावताना प्रशासनावर मोठा ताण येतो. त्यातच कोरोनाग्रस्त व संशयित रुग्णांवर उपचार करताना जैववैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. त्यामुळे शहरवासीयांकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या कचऱ्याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच त्याची हाताळणी करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, त्यांना वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) किट देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.    

कोरोनाग्रस्त व संशयित रुग्ण्यांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांना देखील कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कोरोना साथीच्या रुग्णांवर होणाऱ्या उपचारादरम्यान निर्माण होणाऱ्या कचऱ्याची हाताळणी, प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्याच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्याचा आरोग्य विभाग, प्रदूषण मंडळ तसेच नगर विकास विभाग यांना परिपत्रक काढून दिलेल्या आहेत. जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया व विल्हेवाट सुविधा यांचा देखील यात सामावेश आहे. तसेच त्यावर नियंत्रणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थानिक स्वराज्य संस्था आरोग्य विभाग यांना निर्देश दिले आहेत.

कोरोना उपचारादरम्यान निर्माण होणाऱ्या बायोमेडिकल कचऱ्याची सुरक्षित हाताळणी व विल्हेवाट लावणे, त्यासाठी वेगळ्या रंगांचे कचरा संकलन डबे, पिशव्या, कंटेनर ठेवण्यात यावेत, त्यांचे योग्य विभाजन हे  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या, बायोमेडिकल वेस्ट, तसेच सुधारित प्रणाली मार्गदर्शक सूचनांनुसार करणे गरजेचे आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये किंवा तो कचरा उचलण्यासाठी सीबीडब्ल्यूटीएफने प्रमाणित केलेले कर्मचारी नियुक्त करावेत.

उपचारादरम्यान निर्माण होणारा कचरा साठवण्यासाठी तात्पुरती स्टोरेज रूम करावी व त्याला कोविड-१९ असा फलक लावावा. तेथील कचरा थेट व्हॅनच्या माध्यमातून कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीने उचलावा. इतर कचरा संकलन करताना देखील त्याच्या पिशव्या, कंटेनर यावर नियमित कचरा, असा उल्लेख असावा. त्यामुळे कोरोना उपचारादरम्यान तयार झालेला कचरा व इतर कचरा सहज ओळखता येईल, तसेच त्याची विल्हेवाट लावणे सहज शक्य होईल.

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना तयार झालेल्या कचऱ्यामुळे इतर नियमित कचरा दूषित न होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन २०१६ नियमानुसार त्याची विल्हेवाट लावावी. निवारा केंद्र, छावण्या, तसेच होम क्वारंटाइन केलेल्या ठिकाणचा कचऱ्याची देखील याच पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. हा कचरा जैववैद्यकीय असेल तर तो स्वतंत्र पिवळ्या पिशव्यांमध्ये संकलित करण्यात यावा. तसेच हा कचरा स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रमाणित करून दिलेल्या म्हणजेच कॉमन वेस्ट बायोमेडिकल ट्रीटमेंट फॅसिलिटी यांच्याकडे देण्यात यावा व त्यांनी गोळा करावा.

आरोग्य मंत्र्यांना साकडे.... 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार गजानन बाबर यांनी ही मागणी केली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. कामगारांना तीन स्तरांचे मुखवटे, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई), हॅन्डग्लोव्हज, गमबूट आणि सेफ्टी गॉगल उपलब्ध करून द्यावेत. कचरा संकलनाचे वाहन सोडियम हायपोक्लोराईड अशा जंतूनाशकाने स्वच्छ केले जावे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल देण्यात  यावा, असे निवेदनात नमूद केले आहे.   

Web Title: Tension about biomedical waste becaused by corona; Require of trained personnel for disposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.