Coronavirus : राज्यभरात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षक घरीच तपासणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 03:20 AM2020-03-26T03:20:19+5:302020-03-26T06:03:54+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम शिक्षकांना घरी बसून करता यावे, यासंदर्भात राज्य शासनाने राज्य मंडळाला आदेश द्यावेत, असे निवेदन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले होते.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या मूल्यमापनाचे काम आता शिक्षकांना घरी बसून करता येणार आहे. राज्य मंडळाने याबाबत सर्व विभागीय मंडळांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे काही शिक्षकांनी घरी बसून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम शिक्षकांना घरी बसून करता यावे, यासंदर्भात राज्य शासनाने राज्य मंडळाला आदेश द्यावेत, असे निवेदन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले होते.
शिक्षकांनी उत्तरपत्रिका काळजीपूर्वक हाताळणे बंधनकारक आहे. शाळा महाविद्यालयांमधून शिक्षकांनी मोजून उत्तरपत्रिका घेऊन जाव्यात आणि मोजून जमा कराव्यात. उत्तरपत्रिका तपासताना घरी बाहेरील व्यक्तीला प्रवेश देऊ नये, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
- तुकाराम सुपे, अध्यक्ष, पुणे विभागीय शिक्षण मंडळ