Maharashtra Board: दहावी - बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेणे अशक्य; परीक्षा ऑफलाईनच होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 12:07 PM2022-02-03T12:07:24+5:302022-02-03T12:29:46+5:30
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे.
पुणे : राज्यातील दहावी- बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे.
परिषदेतील महत्वाचे मुद्दे
- 12 वीच्या लेखी परीक्षा ४ मार्च ते 30 मार्च दरम्यान ऑफलाईन होणार
- कोरोनामुळे जे विद्यार्थी तोंडी किंवा परिक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान ती पुन्हा देण्याची संधी
- प्रॅक्टीकल आणि तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारीपासून होण्यापासून तीन मार्च पर्यंत होणार
- यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार.
- जी प्रश्नपत्रिका 40 ते 60 गुणांची आहे, त्यासाठी 15 मिनिटे अतिरिक्त मिळणार तर सत्तर गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक मिळणार.
- प्रॅक्टीकल परिक्षेसाठी बाहेरचे शिक्षक बहिस्थ परिक्षक म्हणून यावेळेस नसतील. तर त्याच शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहिस्थ परिक्षक म्हणून काम करतील.
- मुख्य परिक्षेसाठी परीक्षक त्याच महाविद्यालयातील असतील की बाहेरचे याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे.
- परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी असतील आणि ते झीग झ्याग पद्धतीने बसतील.
- परीक्षे दरम्यान एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याला पुरवणी परिक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल.
- दहावीची परिक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान ऑफलाईन पद्धतीने होणार
- तोंडी परीक्षा दोन वेळेस देण्याची संधी देण्यात आल्याने निकाल लागण्याच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही.
- परीक्षेनंतर 40 ते 45 दिवसांमधे निकाल लावण्यात येणार.
- जुलै महिन्यात पुरवणी परिक्षा होऊ शकते.
- कोरोनामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन ७५ टक्के अभ्याक्रमावर करण्यात आलं आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत.
- परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. करोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल.
- दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावं लागणार आहे. तसंच १० मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल.