दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:38 AM2020-11-22T09:38:30+5:302020-11-22T09:38:30+5:30

पुणे : इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा शुक्रवार (दि. २०) पासून सुरळीतपणे सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या परीक्षांना ...

Tenth and twelfth supplementary examinations begin | दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा सुरू

दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा सुरू

googlenewsNext

पुणे : इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा शुक्रवार (दि. २०) पासून सुरळीतपणे सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या परीक्षांना ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्क्षिण मंडळाच्या अधिऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दहावीच्या मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान तीन गैरप्रकार आढळून आले.

पुरवणी परीक्षेसाठी यावर्षी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. प्रामुख्याने निकाल वाढल्याने तसेच कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर हा आकडा कमी झाला आहे. दहावीसाठी ४२ हजार ३४ तर बारावी परीक्षेसाठी ६७ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी परीक्षेला उपस्थित राहणाºया विद्यार्थ्यांचे सर्व परीक्षा केंद्रांवर थर्मल स्क्रिनींग केले जात आहे. विद्यार्थ्यांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच आसनव्यवस्थाही एकाआड एक करण्यात आल्याने सुरक्षित अंतर राखले जात आहे. कोरोनाची भिती असली तरी पहिल्या दिवशी सुमारे ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोणत्याही केंद्रावरून नकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे मंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले.

दरम्यान, इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान पुणे विभागात २ तर औरंगाबाद विभाग एक असे एकुण तीन गैरप्रकार आढळून आले. बारावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार समोर आला नसल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली.

----------

Web Title: Tenth and twelfth supplementary examinations begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.