दहावीचे परीक्षा शुल्क ‘कॅशलेस’ व्यवहाराने
By admin | Published: January 1, 2017 04:39 AM2017-01-01T04:39:02+5:302017-01-01T04:39:02+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने नोटाबंदीच्या निर्णयामुळे मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांकडून जमा करण्यास स्थगिती दिली होती;
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने नोटाबंदीच्या निर्णयामुळे मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांकडून जमा करण्यास स्थगिती दिली होती; मात्र येत्या २ जानेवारीपासून ‘कॅशलेस व्यवहारा’ने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारण्यास सुरुवात करावी, असे आदेश राज्य मंडळातर्फे संबंधित शाळांना देण्यात आले आहेत.
सद्य:स्थितीत ज्या माध्यमिक शाळा परीक्षा शुल्क प्रचलित चलनासह रोखीने भरू शकत असतील, त्यांनी प्रचलित पद्धतीने बँकेत रोख रक्कम चलनाद्वारे भरावी. त्याचप्रमाणे रोखीने शुल्क भरणे शक्य नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॅशलेस पद्धतीने शुल्क जमा करावे.
विद्यार्थ्यांना रोखीने शुल्क जमा करण्यास अडचणी येत असतील, तर शाळांनी संबंधित विभागीय मंडळाच्या सचिवांच्या नावे धनाकर्ष (डीडी) काढून चलन व धनाकर्ष, तसेच विद्यार्थ्यांची यादी मंडळांकडे द्यावी. तसेच, चलनावर विभागीय मंडळांचा शिक्का व स्वाक्षरी घ्यावी. ज्या शाळांना आरटीजीएस किंवा एनईएचटीद्वारे रक्कम जमा करायची आहे.