दहावी निकाल; अकरावी प्रवेश मार्गी लागण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:12 AM2021-05-12T04:12:44+5:302021-05-12T04:12:44+5:30
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे प्रसिद्ध करण्यास तयार असणाऱ्या शाळांचा अभिप्राय ऑनलाइन पद्धतीने ...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे प्रसिद्ध करण्यास तयार असणाऱ्या शाळांचा अभिप्राय ऑनलाइन पद्धतीने मागविला होता. तसेच इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घ्यावी का? यावरही ऑनलाइन मत नोंदवण्याची आवाहन केले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सर्वांना ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे अभिप्राय नोंदवण्याची संधी उपलब्ध आहे. परंतु, मंगळवारी सायंकाळपर्यंत ६५ टक्के मते सीईटी घ्यावी, या बाजूने नोंदविली आहेत. तर ८२ टक्क्यांहून अधिक शाळा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यास अनुकूल असल्याचे ऑनलाइन सर्वेक्षणात दिसून आले आहे. अकरावी प्रवेशासाठी राज्य शासनाने सीईटी परीक्षा घ्यावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील काही व्यक्तींकडून केले जात आहे. परंतु, ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे सध्या परिस्थितीत शक्य दिसत नाही. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्याचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे, असाही चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.