दहावी-बारावीच्या शिक्षकांचे लसीकरण व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:57+5:302021-03-14T04:10:57+5:30

मंचर : पुणे जिल्ह्यात इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे दहावी व बारावी वर्गांस अध्यापन करणाऱ्या सर्व ...

Tenth-twelfth grade teachers should be vaccinated | दहावी-बारावीच्या शिक्षकांचे लसीकरण व्हावे

दहावी-बारावीच्या शिक्षकांचे लसीकरण व्हावे

Next

मंचर : पुणे जिल्ह्यात इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे दहावी व बारावी वर्गांस अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना वयाची अट शिथिल करून कोरोना लसीकरण करावे, अशी मागणी आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक वळसे पाटील व सचिव विनोद बोंबले यांनी केली आहे.

सोमवार दि.१५ पासून १० वी व १२ वी वर्ग सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार १० वी व १२ वीच्या वर्गांस शिकविणारे शिक्षक यांना लसीकरण केल्यास विद्यार्थी यांच्या दृष्टीने सुरक्षित वातावरण तयार होऊन पालकवर्गाची कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही. आतापर्यंत: वय वर्ष ५०च्या पुढील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण गेले दोन दिवसांपूर्वी सुरू केले आहे. १० वी व १२ वीच्या वर्गांस शिकविणारे शिक्षक मात्र २५ ते ४५ वयोगटातील आहेत. अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक १२ वीच्या वर्गांना अध्यापन करत असताना अनेकांचे वय २५ ते ४५ दरम्यान आहे. त्यांना पण लसीकरण करावे. आरोग्य कर्मचारी व प्राथमिक शिक्षक यांना ज्याप्रमाणे लसीकरण केले त्या धर्तीवर १० वी व १२ वी वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना लसीकरण करावे. याबाबत मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवमाणे यांना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक वळसे पाटील व सचिव विनोद बोंबले यांनी निवेदन दिले आहे.

Web Title: Tenth-twelfth grade teachers should be vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.