भयंकर..! नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर ११ महिन्यांपासून अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:22 PM2024-11-25T17:22:36+5:302024-11-25T17:22:36+5:30
पुणे : नराधम बापच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेली ११ महिने लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...
पुणे : नराधम बापच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेली ११ महिने लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात कोणाला काहीही सांगायचे नाही. नाही तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती.
याप्रकरणी एका १७ वर्षीय मुलीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ३७ वर्षीय नराधम बापावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटच्या अल्पवयीन फिर्यादी मुलीस तिच्या वडिलांनी मारहाण करून बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. घरात कोणालाही काहीही सांगायचे नाही, नाही तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी दिली.
पीडितेशी वारंवार शरीरसंबंध ठेवून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. ही बाब तिच्या आईला माहिती झाल्यानंतर तिची आई जिथे घरकाम करते, त्यांच्याशी चर्चा करून आई मुलीला घेऊन पोलिसांकडे आली. तेव्हा मुलीची पोलिसांनी फिर्याद घेतली. याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास बाबर करत आहेत.