नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात ५ ठार, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:53 AM2023-04-04T01:53:53+5:302023-04-04T01:56:20+5:30

मृतांची नावे अद्याप समोर आली नसून इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती. तर पिकअप वाहन हे कल्याणच्या दिशेने चालले होते.

Terrible accident on Nagar Kalyan highway 5 dead, one serious | नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात ५ ठार, एक गंभीर

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात ५ ठार, एक गंभीर

googlenewsNext

उदापूर - नगर-कल्याण महामार्गावरील  वाटखळ येथे इनोव्हा गाडी क्रमांक एम एच ०५ ए.एस ६३३७ व मालवाहू पिकप गाडी क्रमांक एम एच १४ जी.डी ४०७४ या गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी आहे.

अपघाताची माहिती समजतात ओतूर पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांची टीम घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने जखमींना ओतूर येथील सरकारी दवाखान्यात आणले. परंतु त्यातील पाच जणांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री ९ वाजता माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळ गावाजवळ पिकअप आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भयंकर होती की, इनोव्हा गाडीत असणाऱ्या सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पिकअप चालक थोडक्यात बचावला आहे. वाहनांचा वेग इतका प्रचंड होता की इनोव्हाची एअर बॅग तुटून बाजूला पडली आहे.   

इनोव्हा गाडीच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने जुन्नर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. मृतांची नावे अद्याप समोर आली नसून इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती. तर पिकअप वाहन हे कल्याणच्या दिशेने चालले होते. 

दरम्यान, नगर-कल्याण महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने वाहनचालकांकडून रस्ते नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Terrible accident on Nagar Kalyan highway 5 dead, one serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.