Accident: पुणे - मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, १ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:01 PM2022-04-04T13:01:27+5:302022-04-04T13:01:37+5:30

कामशेत गावच्या हद्दीतील जुना मुंबई महामार्गावरील कामशेत खिंडीत सोमवारी पहाटे अडीच वाजल्याच्या सुमारास कारच्या भीषण अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू

Terrible accident on Pune Mumbai highway Two died on the spot one seriously injured | Accident: पुणे - मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, १ जण गंभीर जखमी

Accident: पुणे - मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, १ जण गंभीर जखमी

googlenewsNext

वडगाव मावळ : कामशेत गावच्या हद्दीतील जुना मुंबई महामार्गावरील कामशेत खिंडीत सोमवारी पहाटे अडीच वाजल्याच्या सुमारास कारच्या भीषण अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन (वय ४४, रा. कळवा, ठाणे) व औतार गुरुदयाल सिंग सेहेरा (वय ५०,रा. कोपरी, ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर नितेशकुमार देवेंद्रकुमार जैन हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
  
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवारी पहाटे अडीच वाजल्याच्या सुमारास मुंबई कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या लाकूड वाहतूक करणार कंटेनर हा कामशेत खिंड उतरत असताना चालकांचे नियंत्रण सुटल्याने पुणे लेनवर पलटी झाला. व कंटेनर मधील सर्व लाकडे मुंबई लेनवर पडली होती. त्यावेळी पुणे कडून मुंबईकडे निधालेली मारुती कार ही महामार्गावर पडलेल्या लाकडांना वेगात येऊन आदळल्याने कार मधील पुढे बसलेले राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन व औतार गुरुदयाल सिंग सेहेरा यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर मागच्या सीटवर बसलेले नितेशकुमार देवेंद्र कुमार जैन हे या अपघात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामशेत येथील महावीर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

 या अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार समीर शेख व पोलीस नाईक अनिल हिप्परकर, सुनिल गवारी, सचिन निंबाळकर, केकेआर रुग्णवाहिकेचे चालक कैसर शेख, स्वप्नील मोकाशी यांनी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना तात्काळ बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. या आपघातामुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने व लाकडे बाजूला करून वाहरुक सुरळीत करण्यात आली आहे.

Web Title: Terrible accident on Pune Mumbai highway Two died on the spot one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.