इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा भयानक स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:14 AM2021-02-17T04:14:36+5:302021-02-17T04:14:36+5:30
पुणे : इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीपेक्षा भयानक आणीबाणी सध्याच्या केंद्र सरकारने आणली आहे, असा आरोप खासदार आणि ...
पुणे : इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीपेक्षा भयानक आणीबाणी सध्याच्या केंद्र सरकारने आणली आहे, असा आरोप खासदार आणि माजी महापौर वंदना चव्हाण यांनी केला.
संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाला साथ देण्यासाठी शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होत्या. या सभेस माजी महापौर व खासदार वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, कमल व्यवहारे, रजनी त्रिभूवन, वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले, अभय छाजेड, श्याम देशपांडे, प्रशांत बधे तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, विठ्ठल जाधव, अभिजित मोरे आदी उपस्थित होते.
वंदना चव्हाण म्हणाल्या की, या देशात कोणी काही बोलू शकत नाही अशी स्थिती केंद्र सरकारने केली आहे. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविषयी बोलले जाते. मात्र ती आणीबाणी जेवढी वाईट नव्हती, त्यापेक्षा भयानक आणीबाणी आत्ता आहे. केंद्र सरकार सगळ्या गोष्टींचे खासगीकरण करू पाहत आहे. याबद्दल भारतीयांना जागे करावे लागेल.