खेड तालुक्यात भयावह परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:26+5:302021-04-07T04:11:26+5:30
नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि नियमांचे पालन न करण्यामुळे सातत्याने रुणांची संख्या वाढत आहे.त्यामुळे चार लाख एकोणतीस हजाराचा दंड पोलिसांनी जमा ...
नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि नियमांचे पालन न करण्यामुळे सातत्याने रुणांची संख्या वाढत आहे.त्यामुळे चार लाख एकोणतीस हजाराचा दंड पोलिसांनी जमा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चाकण नगरपरिषद हद्दीतील कोरोना बाधितांची संख्या सरासरी वीस पेक्षा अधिक आहे .तर जवळच्या औद्योगिक वसाहतीतील, सावरदारी, वासुली ,शिंदे ,वराळे ,भांबोली ,महाळुंगे , निघोजे या औद्योगिक वसाहतीतील गावसह नजिकच्या गावातून ही कोरोना संक्रमित रुग्णांचीसंख्या वाढत आहे . गेल्या वीस दिवसांपासून चाकण नगरपरिषद हद्दीतील १ हजार ६०० व्यापारी व विक्रेते यांची अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली .पैकी सुमारे १६४ जण संक्रमित असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली .तर ग्रामीण रूग्णालयात चार हजार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली . यावेळी जण ४५० बाधित असल्याचे निष्पन्न झाले . तर तीन हजार जणांचे लसीकरण करण्यात आले . अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ . नंदा ढवळे यांनी दिली .
चांडोली येथील ग्रामीण रूग्णालयात सुमारे सहा हजार लोकांना लसीकरण करण्यात आले . आंबेडकर वसतिगृह व चांडोली रूग्णालयातील कोविड सेंटर मध्ये ४५ रूग्ण उपचार घेत आहेत .अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे यांनी दिली . महाळुंगे कोविड सेंटर मध्ये ४५६ रूग्ण उपचार घेत आहेत . तर करंजविहिरे येथील ग्रामीण रुग्णालयात ७५० बाधीत सापडले आणि ५००० लसीकरण करण्यात आल्याची माहिती डॉ जयश्री महाजन ह्यांनी दिली. नागरिक याबाबत निष्काळजीपणे वावरत आहेत . या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गेल्या महिन्यात ४ लाख २९ हजार ५०० रुपये दंड वसूल
केला आहे .
. ******************
विना मास्क - | ७३५ जण | ३ लाख ३५ हजार . दंड
आस्थापना | २३ | ६० हजार रुपये दंड
विवाह समारंभ | २ | ५ हजार रुपये दंड
जमावबंदी | २८ | २८ हजार रुपये दंड
सार्व .ठिकाणी | १ | १ हजार रुपये दंड
थुंकणे
_______________________________________