साेशल मीडियावर कोयत्याचे स्टेट्स ठेवून दहशत; नऊ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:21 PM2023-01-23T12:21:31+5:302023-01-23T12:22:00+5:30
शहरात दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढतच आहे
पुणे: शहरात दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर साेशल मीडियावर कोयत्याचे स्टेट्स ठेवून दहशत निर्माण करणाऱ्यांवरही धडक कारवाई सुरू आहे. असे स्टेट्स ठेवणाऱ्या लोणी काळभोर परिसरातील ९ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यात ३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ही कारवाई केली.
तेजस संजय बधे (वय १९), उदय सिद्धार्थ कांबळे (वय १९), प्रसाद उर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय १९, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय २०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय २८, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय ४३, रा. वानवडी, पुणे), तसेच आणखी तीन अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेतले आहे.