पिस्टलच्या जोरावर दहशत अन् पिस्टलनेच खेळ खल्लास; शरद मोहोळची 'इनसाईड स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 08:39 PM2024-01-06T20:39:26+5:302024-01-06T20:44:06+5:30

शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता

Terror by the force of the pistol and the pistol itself the game; Read the inside story of Sharad Mohol.. | पिस्टलच्या जोरावर दहशत अन् पिस्टलनेच खेळ खल्लास; शरद मोहोळची 'इनसाईड स्टोरी'

पिस्टलच्या जोरावर दहशत अन् पिस्टलनेच खेळ खल्लास; शरद मोहोळची 'इनसाईड स्टोरी'

किरण शिंदे

गँगस्टर शरद मोहोळ याचा पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात शुक्रवारी खून करण्यात आलाय.. जवळच्या सहकाऱ्यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या.. भर दिवसा घडलेल्या या घटनेनंतर खरंतर एकच खळबळ उडाली होती.. कोथरूड परिसरात दहशतीचे वातावरण होतं.. शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदाचा टोळी भडका उडणार का अशी चर्चा सुरू झाली.. शरद मोहोळ ची हत्या करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केलीय.. या हत्याकांडात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.. मात्र आता शरद मोहोळ याचं आणि भाजपचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.. काय होतं हे कनेक्शन पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून..

शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता.. विशेष म्हणजे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, भाजपचे तत्कालीन पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शरद मोहोळ यांच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता.. एका कुख्यात गुंडाच्या पत्नीने अशाप्रकारे भाजपमध्ये प्रवेश केल्याने तेव्हा सर्व स्तरातून टीका केली जात होती.. मात्र कुठलीही तमा न बाळगता शरद मोहोळ याच्या पत्नीला पक्षात प्रवेश देण्यात आला होता.. स्वाती मोहोळ यांचा हिंदू आक्रोश मोर्चातही अनेकदा सहभाग राहिला आहे.. भाजपने केलेल्या अनेक स्थानिक कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या.. स्वाती मोहोळ यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद मोहोळ हा देखील राजकारणात एन्ट्री करणार अशा चर्चा होत्या.. त्या दिशेने त्याची तयारीही सुरू होती.. मात्र त्याआधीच त्याचा खेळ खल्लास झाला.. जे शस्त्र हातात धरून शरद मोहोळने गुंडगिरीला सुरुवात केली होती त्याच शस्त्राने त्याच्या आयुष्याची अखेर झाली..मुळशी खोऱ्यात आणि प्रामुख्याने पुण्याच्या कोथरूड भागात शरद मोहोळ टोळीचं वर्चस्व होतं.. त्याचा फायदा निवडणुकीच्या काळात भाजपला होणार होता.. कुख्यात गुंडाला पक्षात घेतल्यामुळे तेव्हा भाजपवर टीका देखील झाली होती..

दरम्यान शरद मोहोळच्या हत्येनंतर पुणेपोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.. यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे.. या सर्वांना आज कोर्टात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.. आतापर्यंत झालेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.. दहा वर्षांपूर्वी झालेल्या वादातून शरद मोहोळचा गेम करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.. शरद मोहोळ याचे दहा वर्षांपूर्वी दोघांसोबत भांडण झाले होते.. तेव्हापासून शरद मोहोळ यांना तुच्छ वागून द्यायचा, चार चौघात आपमान करायचा.. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी अतिशय थंड डोक्याने कट रचला होता.. मागील महिनाभरापासून त्यांनी शरद मोहोळचा खेळ खल्लास करण्याची तयारी सुरू केली होती.. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक अशा पिस्टल खरेदी केल्या होत्या..

या संपूर्ण हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा काही दिवसांपूर्वीच शरद मोहोळ टोळीत सहभागी झाला होता.. आणि हा संपूर्ण त्या कटाचाच भाग होता.. टोळीत सहभागी झालेला पोळेकर पुढे जाऊन शरद मोहोळ याचा विश्वासू बनला.. सतत तो शरद मोहोळ याच्यासोबत वावरू लागला.. त्याच्या रोजच्या दिनक्रमाची माहिती गोळा करून त्याने इतर आरोपींना देण्यास सुरुवात केली.. आणि शुक्रवारच्या दिवशी त्याने शरद मोहोळचा गेम केला.. शरद मोहोळच्या हत्येने एका दहशतीचा अंत झाला..

Web Title: Terror by the force of the pistol and the pistol itself the game; Read the inside story of Sharad Mohol..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.