पुणे शहरात कोयता गँगची दहशत कायम; शिवाजीनगर, हडपसर भागात टोळक्याची दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 09:46 AM2023-01-18T09:46:55+5:302023-01-18T09:47:46+5:30
शिवाजीनगर, हडपसर भागात टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना उघडकीस...
पुणे : शहरात कोयते उगारून दहशत माजविण्याचे सत्र कायम आहे. शिवाजीनगर, हडपसर भागात टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना उघडकीस आली.
सतीश भीमा काळे (वय ४१, रा. जुना तोफखाना, शिवाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तुषार काकडे, मोन्या कुचेकर, दीपू शर्मा, दाद्या बगाडे (सर्व रा. हडपसर) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सराईत गुंड दीपू शर्मा याला अटक केली आहे.
आराेपी आणि काळे ओळखीचे आहेत. चार महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाला झाला होता. आरोपी मध्यरात्री काळेच्या घराजवळ आले. काळे घरासमोर झोपला होता. आरोपी बगाडे याने काळे याच्यावर कोयत्याने वार केला. त्यावेळी काळेने मला का मारताे,अशी विचारणा केली. आरोपींनी त्याच्या डोक्यात वार केला. आरडाओरडा ऐकून काळेची पत्नी, मुलगा घरातून बाहेर आले. त्यावेळी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ करून आरोपी दुचाकीवरून पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. तरडे तपास करीत आहेत.