चिंचवड येथील तोडफोड, धुडगूस घालणारे आरोपी जेरबंद : दहा वाहनांचे झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:24 AM2017-09-09T02:24:22+5:302017-09-09T02:24:35+5:30

चिंचवडगावातील गणेशपेठ येथील भैरवनाथ मंदिराजवळ गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन टोळक्याने धुडगूस घालत परिसरातील दहा वाहनांची तोडफोड केली.

Terrorist accused in Chinchwad, Junkebund accused of fury: Ten vehicles caused damage | चिंचवड येथील तोडफोड, धुडगूस घालणारे आरोपी जेरबंद : दहा वाहनांचे झाले नुकसान

चिंचवड येथील तोडफोड, धुडगूस घालणारे आरोपी जेरबंद : दहा वाहनांचे झाले नुकसान

Next

पिंपरी : चिंचवडगावातील गणेशपेठ येथील भैरवनाथ मंदिराजवळ गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन टोळक्याने धुडगूस घालत परिसरातील दहा वाहनांची तोडफोड केली. हाणामारीत काही जण जखमीही झाले. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी १७ जणांना जेरबंद केले आहे.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पहिल्या गुन्ह्यात विशाल दत्तात्रय भदे (वय ३८, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगेश नंदकुमार सांगळे (वय २०, रा. केशवनगर, चिंचवड), आकाश तानाजी लांडगे (वय २२, रा. चिंंचवडगाव), ओंकार बाबू नेहरे (वय १८, रा. बनसोडे चाळ, चिंचवड), साहील सुधीर कांकरिया (वय १८, रा. गांधीपेठ, चिंचवड), ललीत सुनील सुतार (वय २२, रा. चिंचवड), निरंजन आनंद जगताप (वय १८, रा. काकडे पार्क, चिंचवड), शुभम विनायक चौधरी (वय २०, रा. केशवनगर, चिंचवड), दीपक कोंडिबा भिसे (वय १९, रा. पॉवर हौस चौक, चिंचवड), अंबड संदेश तलाठी (वय २१, रा. दर्शन हॉलच्या पाठीमागे, चिंचवड) अशी जेरबंद केलेल्यांची नावे असून आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
हे आरोपी गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हातात दांडके, हॉकीस्टीक, बॅट व सिमेंटचे ब्लॉक घेऊन आले. तसेच परिसरात उभ्या असलेल्या दहा वाहनांची तोडफोड केली. यानंतर विशाल भदे यांच्याकडील पाच हजारांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते.
दुसºया गुन्ह्यात विकी घोलप (वय २०, रा. पागेची तालीमजवळ, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रशांत दिलीप यादव (वय ३०, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, चिंचवड), अक्षय अरुण काशिद (वय २४, रा. मंगलमूर्ती वाड्याजवळ, चिंचवड), प्रवीण दिलीप यादव (वय ३२, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, चिंचवड), सचिन अनिल खोल्लम (वय २०, रा. चिंचवडे चाळ, चिंचवड) यांना जेरबंद केले आहे.
पोलिसांकडून शांततेचे आवाहन
या आरोपींनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून हॉकीस्टीक, दांडके व कोयत्याने विकी घोलप व त्यांच्या मित्राला जुन्या भांडणाच्या रागातून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कायदा हातात घेऊन कोणीही परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी केले आहे.

Web Title: Terrorist accused in Chinchwad, Junkebund accused of fury: Ten vehicles caused damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.